इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध, असं का ? CM Devendra Fadnvis यांचा सवाल

इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध, असं का ? CM Devendra Fadnvis यांचा सवाल

116
इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध, असं का ? CM Devendra Fadnvis यांचा सवाल
इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध, असं का ? CM Devendra Fadnvis यांचा सवाल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnvis) यांनी शनिवारी पुन्हा एकदा इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याच्या आपल्या सरकारच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले. इंग्रजीला पालख्या व हिंदीला विरोध हा कुठला विचार आहे? असा खडा सवाल त्यांनी यासंबंधी उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी नाशिक येथील दंगल जाणिवपूर्वक घडवण्यात आल्याचाही दावा केला. (CM Devendra Fadnvis)

जाणिवपूर्वक दंगल घडवली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, नाशिक येथे जाणिवपूर्वक दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला. न्यायालयाच्या निर्णयानंतर तेथील लोकांनी वादग्रस्त अतिक्रमण काढण्याविषयी प्रशासनाला सांगितले. त्यानंतर त्यांनी स्वतःच ते अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. पण त्याचवेळी ही सगळी मंडळी जी दंगलीमध्ये दिसत आहेत, त्यांनी जाणिवपूर्वक दंगल घडवली. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई केली जात आहे. (CM Devendra Fadnvis)

इंग्रजीला पालख्या अन् हिंदीला विरोध का?
देवेंद्र फडणवीस यांनी भाषावादावर प्रतिक्रिया देताना सांगितले, “मी या प्रकरणी परवाच माझी भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा ही कंपलसरी आहे. ती अनिवार्य आहे. सर्वांनी मराठी भाषा शिकलीच पाहिजे. त्यासोबत दुसरी एखादी भाषा शिकायची असेल तर ती ही शिकता येते. मला कधीकधी आश्चर्य वाटते की, हिंदीला विरोध व इंग्रजीला का नाही? इंग्रजीला पालख्या व हिंदीला विरोध हा कुठला विचार आहे? त्यामुळे मराठीला कुणी विरोध केला तर आम्ही सहन करणार नाही.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. (CM Devendra Fadnvis)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.