Raj-Uddhav ठाकरे एकत्र का येऊ शकत नाही?

109
Raj-Uddhav ठाकरे एकत्र का येऊ शकत नाही?
Raj-Uddhav ठाकरे एकत्र का येऊ शकत नाही?
  • खास प्रतिनिधी

राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येतील का? यावर गेले काही दिवस चवीचवीने चर्चा होत आहे. अनेक ठिकाणी ते एकत्र यावे, यासाठी होर्डिंग, बॅनर्सही लागले. मात्र दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणे सध्यातरी शक्य नाही, असे चित्र आहे. याची काही कारणेही आहेत..

समोरच्याची इच्छा आहे का?

राज आणि उद्धव ठाकरे (Raj-Uddhav) यांच्या संबंधांबाबत अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी त्यांच्या पॉडकास्टमध्ये घेतलेल्या मुलाखतीत राज यांना काही प्रश्न विचारले. त्यावर उत्तर देताना राज म्हणाले होते की, उद्धव यांच्याशी असलेल्या मतभेदांपेक्षा महाराष्ट्राचे प्रश्न खूप मोठे आहेत. तसेच उद्धव यांच्यासोबत काम करायला काहीच हरकत नव्हती पण समोरच्याची इच्छा आहे का? असे वक्तव्य करून दोघे एकत्र येऊ शकतात, असे संकेत दिले.

(हेही वाचा – IPL 2025, MI vs LSG : घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सचा आणखी एक दमदार विजय, लखनौला ५४ धावांनी हरवलं)

शक्य आहे का?

त्यानंतर विविध ठिकाणांहून दोन्ही भावांनी एकत्र येऊन राजकारण करावे, असा सूर अनेकांनी व्यक्त केला. पण हे प्रत्यक्ष शक्य आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. याचे उत्तर नाही, असे येण्यास वाव आहे. त्याची कारणे पुढीलप्रमाणे:

  1. सगळ्यात महत्वाचे म्हणजे राज यांनी याच मुलाखतीत स्पष्ट केले की, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या व्यतिरिक्त अन्य कुणाच्याही हाताखाली काम करणार नाही, असे जाहीर केले.
  2. एकत्र आल्यानंतरही अंतिम शब्द कोणाचा असेल, यावर एकमत होणे कठीण आहे.
  3. उद्धव ठाकरे यांनी समोर ठेवेलेल्या अटी राज ठाकरे मान्य करतील का?
  4. दोन्ही बंधूंचा राजकीय अजेंडा हिंदुत्व आणि मराठी हा असल्याने, एकत्र आल्यास कार्यकर्ते, नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई होण्याची शक्यता अधिक आहे..
  5. सर्व मतभेद विसरून एकत्र येण्याची दोन्ही ‘कुटुंबियां’ची इच्छाशक्ती आहे का?

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.