एखाद्या वेबसिरीजमध्ये जसे घटनाक्रम घडतात, तसे ख-या आयुष्यात लोकांना महाराष्ट्रात पाहायला मिळाले. अंबानीच्या घराखाली ठेवलेल्या स्फोटकांचे प्रकरण थेट राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांपर्यंत पोहोचले. बडतर्फ पोलीस निरिक्षक सचिन वाझे आणि माजी गृहमंत्री यांच्या खंडणी वसुलीच्या प्रकरणात आता एक नवं वळण आलं आहे. अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी कोण सचिन वाझे ? असं म्हणत मी त्यांना ओळखत नाही, असा दावा चांदीवाल आयोगापुढे केला. तसेच अनेक प्रश्नांना माहिती नाही, असे उत्तर त्यांनी वाझेच्या वकिलांना दिले.
वाझेच्या वकिलाने विचारले प्रश्न
राज्य सरकारने नेमलेल्या न्यायमूर्ती के.यू. चांदीवाल आयोग खंडणी वसुली प्रकरणाची चौकशी करत आहे. सोमवारी वाझेचे वकिल अॅड. नायडू यांनी देशमुख यांची उलटतपासणी घेतली. अन्वय नाईक आत्महत्या, टीआरपी घोटाळा आदी प्रकरणांबाबत प्रामुख्याने देशमुख यांना प्रश्न विचारण्यात आले.
( हेही वाचा: शरद पवारांना कोरोना, पंतप्रधानांकडून विचारपूस)
मी सचिन वाझेला ओळखत नाही
नाईक आत्महत्या प्रकरणात तपास व्यवस्थित झाला नाही, असे अनेकांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणाचा तपास दुस-या अधिका-याकडे सोपवण्यात आला, असे देशमुख म्हणाले, मात्र यावेळी अधिका-यांचे नाव वा चर्चा आठवत नाही, असे उत्तर त्यांनी दिले. तसेच मास्क काळाबाजार, नाईक आत्महत्या प्रकरणात तांत्रिक मदतीसाठी तुम्ही वाझे यांना सूचना केल्या होत्या का, या प्रश्नावर मी सचिन वाझेला ओळखत नाही, असे उत्तर देशमुख यांनी दिले.
Join Our WhatsApp Community