केरळ (Keral) पोलिसांनी तीन पाकिस्तानी (Pakistan) नागरिकांना देश सोडण्यासाठी दिलेली नोटीस मागे घेतली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्राने सर्व राज्यांना त्यांच्या त्यांच्या राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना पुनः पाकिस्तानात पाठवण्याचे आदेश दिले होते. मात्र केरळ पोलिसांनी ते तीन पाकिस्तानी (Pakistan) नागरिक भारतात दीर्घकाळ वास्तव्य करत आहे, हे कारण दिले.
केरळ पोलिसांनी नोटीस घेतली मागे
परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानी (Pakistan) नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याच्या आदेशानंतर केरळ पोलिसांनी कोझिकोड जिल्ह्यात राहणाऱ्या तीन पाकिस्तानी नागरिकांना नोटिस बजावल्या होत्या. त्यापैकी एक पुरूष आणि दोन महिला आहेत. पुथनपुरावलप्पिल हमसा, खमरुन्निसा आणि अस्मा अशी या तिघांची नावे आहेत. त्यांना शुक्रवारी, २५ एप्रिल २०२५ आणि शनिवारी नोटिस दिली. त्यांना २७ एप्रिलपर्यंत भारत सोडून पाकिस्तानात (Pakistan) परत जाण्यास सांगण्यात आले होते. तथापि, शनिवारी रात्री ही सूचना मागे घेण्यात आली. केरळ पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हे तिघेही बऱ्याच काळापासून तिथे राहत होते. केरळ पोलिसांनी सांगितले की, ज्यांनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला आहे किंवा दीर्घकालीन व्हिसावर भारतात आहेत त्यांना जारी केलेल्या नोटिस मागे घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
कोझिकोडमध्ये नोटीस मिळालेल्या पुथनपुरावलाप्पिल हमसा यांनी सांगितले की ते “चहा विकण्यासाठी” पाकिस्तानात (Pakistan) गेले होते आणि २००७ मध्ये परत आले. तेव्हापासून ते व्हिसाच्या आधारावर भारतात राहत आहेत. तथापि, त्याचा व्हिसाची मुदतही संपली, त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात खटला दाखल केला. न्यायालयाने त्याला भारतात राहण्याची परवानगी दिली होती. उर्वरित दोन महिला बहिणी आहेत आणि त्यांचे वडील कराचीमध्ये व्यवसाय करायचे. दोघेही १९९२ मध्ये पाकिस्तानहून भारतात आले होते. तेव्हापासून ती भारतात राहत आहे. ती भारतीय नागरिकत्वासाठीही प्रयत्न करत आहे.
Join Our WhatsApp Community