
-
प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षेला महाविकास आघाडीने (मविआ) हात दिला आहे. शिवसेना उबाठाचे नेते विनायक राऊत यांनी अजित पवारांना थेट ऑफर देत म्हटले, “मविआत या, तुमचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण होईल.” रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी ही ऑफर दिली. अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली होती, पण नंतर सारवासारवही केली होती. (Ajit Pawar)
(हेही वाचा – Bhandara Nagzira Wildlife : वाघ गेले सुट्टीवर; पर्यटकांची अभयारण्याकडे पाठ)
राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपात वाढत्या दुराव्याचा उल्लेख करत शिंदे नैराश्यात असल्याचा टोला लगावला. दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर मनसे आणि शिवसेना उबाठा युतीच्या चर्चांना वेग आला आहे. उद्धव ठाकरे यांनीही या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. राऊत म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत, ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे.” (Ajit Pawar)
(हेही वाचा – IPL 2025, Kagiso Rabada : बंदीनंतर गुजरात टायटन्सचा कासिगो रबाडा आयपीएलमध्ये परतला)
याशिवाय, राऊत यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. “पहलगाम हल्ला हे मोदी सरकारचे अपयश आहे. युद्धाचे वातावरण तयार करून पक्षाची प्रसिद्धी केली जात आहे, तर लोककल्याणाच्या योजना बंद पडत आहेत,” असे राऊत म्हणाले. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय समीकरणे पुन्हा चर्चेत आली आहेत. (Ajit Pawar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community