‘बाहेरचे पाहुणे जास्त झाले की, घरातल्या लोकांना बाहेर झोपावं लागतं; Sangram Thopate यांच्या प्रवेशावर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

155
‘बाहेरचे पाहुणे जास्त झाले की, घरातल्या लोकांना बाहेर झोपावं लागतं; Sangram Thopate यांच्या प्रवेशावर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
‘बाहेरचे पाहुणे जास्त झाले की, घरातल्या लोकांना बाहेर झोपावं लागतं; Sangram Thopate यांच्या प्रवेशावर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

भोर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopate) यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, थोपटेंच्या या पक्षांतराने भोर मतदारसंघातील निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. भाजपाचे मुळशी तालुका सरचिटणीस दत्तात्रय जाधव यांनी याबाबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांना पत्र लिहून आपला संताप व्यक्त केला आहे.

जाधव यांनी पत्रात म्हटले आहे की, “ज्यांचा आपण आयुष्यभर तिरस्कार केला, ते उद्या आपल्या सोबत येणार याचं विशेष आश्चर्य वाटतं. जुन्या जाणत्या वडीलधाऱ्यांची एक म्हण आठवते, ‘घरात बाहेरचे पाहुणे जास्त झाले की घरातल्या लोकांना बाहेर झोपावं लागतं.’” या शब्दांत त्यांनी बाहेरून येणाऱ्या नेत्यांमुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांना दुर्लक्षित केले जात असल्याचा आरोप केला आहे.

(हेही वाचा – देशाबाहेर जाऊन बदनामी करण्याची Rahul Gandhi यांची परंपरा चालूच; म्हणे, निवडणूक आयोगाने तडजोड केली)

थोपटेंच्या (Sangram Thopate) भाजपा प्रवेशामुळे स्थानिक कार्यकर्त्यांना आपले राजकी ठरेल, अशी भीती व्यक्त होत आहे. भोर मतदारसंघात भाजपाला मजबूत करण्यासाठी वर्षानुवर्षे मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांना या निर्णयाने धक्का बसला आहे. कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, पक्षाने बाहेरील नेत्यांना सामावून घेताना स्थानिक नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे.

दरम्यान, थोपटेंच्या (Sangram Thopate) प्रवेशाबाबत पक्षश्रेष्ठींकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या घटनेमुळे भोर मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांच्या नाराजीचा परिणाम आगामी निवडणुकांवर होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी भाजपा नेतृत्व काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.