West Bengal : “तृणमूल काँग्रेस आणि पोलिसांकडून मिळत आहेत धमक्या” ; मुर्शिदाबाद हिंसाचारातील पिडीतेचे राज्यपालांना पत्र

West Bengal : "तृणमूल काँग्रेस आणि पोलिसांकडून मिळत आहेत धमक्या" ; मुर्शिदाबाद हिंसाचारातील पिडीतेचे राज्यपालांना पत्र

75
West Bengal :
West Bengal : "तृणमूल काँग्रेस आणि पोलिसांकडून मिळत आहेत धमक्या" ; मुर्शिदाबाद हिंसाचारातील पिडीतेचे राज्यपालांना पत्र

पश्चिम बंगालमधील (West Bengal) मुर्शिदाबाद जिल्ह्यात अलिकडेच झालेल्या हिंसाचारात पती आणि मुलगा गमावलेल्या दोन पिडीत महिलांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. यांची भेट घेतली. त्यांनी राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांच्याकडे त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची मागणी केली आहे. या महिलांनी आरोप केला आहे की, त्यांना सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि पोलिसांकडून सतत धमक्या मिळत आहेत, ज्यामुळे त्यांच्या जीवाला धोका आहे. (West Bengal)

पत्रात काय ?
मुर्शिदाबादमध्ये दंगलखोरांच्या जमावाने घराबाहेर काढून ठार मारलेल्या हर गोविंद दास आणि त्यांचा मुलगा चंदन दास यांच्या पिडीत पत्नी पारुल दास आणि पिंकी दास यांनी राज्यपालांना चार पानांचे पत्र लिहून कोलकाता उच्च न्यायालयात त्यांच्या सुरक्षित आगमनाची व्यवस्था करण्याची विनंती केली आहे. “आम्ही हर गोविंद दास आणि चंदन दास यांच्या पत्नी आहोत. आम्ही हे पत्र तुटलेल्या हृदयाने आणि थरथरत्या हातांनी लिहित आहोत. आम्ही हे पत्र तुम्हाला एका गुप्त ठिकाणाहून पाठवत आहोत कारण केवळ सत्ताधारी पक्षच नाही तर पोलिस देखील आम्हाला सतत धमकावत आहेत.” असे पत्रात म्हटले आहे. (West Bengal)

पोलिसांविरुद्ध आरोप
रविवारी सकाळी विधाननगर पूर्व पोलिस ठाण्यातील एका पथकाने सॉल्ट लेक बीजी ब्लॉकमधून जबरदस्तीने त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही दोन्ही पिडीतांनी केला आहे. (West Bengal)

महिलांनी केले आरोप
तथापि, पोलिसांनी हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले. पोलिसांनी सांगितले की, हर गोविंद यांचा धाकटा मुलगा समर्थ दास याने शनिवारी रात्री शमशेरगंज पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली की, दोन्ही पिडीतांना त्यांच्या घरातून कोणीतरी कारमधून घेऊन गेले होते आणि त्या २४ तासांपेक्षा जास्त काळ घरी परतल्या नाहीत. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आणि दोन्ही महिला विधाननगरमधील एका घरात राहत असल्याचे आढळून आले. (West Bengal)

या प्रकरणात, पश्चिम बंगाल पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक निवेदन जारी केले आणि म्हटले आहे की, “अनेक ठिकाणी असा प्रचार केला जात आहे की शमशेरगंज पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी मृताच्या कुटुंबाला धमकावले, ज्यामुळे ते घराबाहेर पडले. हे पूर्णपणे खोटे आहे. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे त्या महिलांच्या सुरक्षिततेबद्दल फक्त चौकशी केली आणि नंतर तेथून परतले. तक्रार मिळाल्यावर चौकशी करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे आणि हेच करण्यात आले.” (West Bengal)

गेल्या महिन्यात मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा कायद्याविरुद्ध झालेल्या हिंसक निदर्शनांदरम्यान हरगोबिंद दास आणि त्यांचा मुलगा चंदन दास यांची हत्या झाली होती हे उल्लेखनीय आहे. (West Bengal)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.