Congress ला 3 निवडणुकांमध्ये जितक्या जागा मिळाल्या, त्यापेक्षा जास्त जागा आम्हाला आता मिळाल्या; Narendra Modi यांचा टोला

2014, 2019 आणि 2024 या तिन्ही निवडणुकांमध्ये मिळून जेवढ्या जागा त्यांना मिळाल्या, त्यापेक्षा जास्त जागा यंदा आम्हाला मिळाल्या आहेत, असा टोला पंतप्रधानांनी लगावला.

169
QS World University क्रमवारीत भारतीय विद्यापीठांच्या कामगिरीत सुधारणा; पंतप्रधानांनी व्यक्त केलं समाधान

आम्हाला यंदाच्या निवडणुकीत कमी जागा मिळाल्यावरून बोलले जात आहे; पण काँग्रेसला 10 वर्षांनंतरदेखील शंभर जागांचा आकडा गाठता आलेला नाही. 2014, 2019 आणि 2024 या तिन्ही निवडणुकांमध्ये मिळून जेवढ्या जागा त्यांना मिळाल्या, त्यापेक्षा जास्त जागा यंदा आम्हाला मिळाल्या आहेत. भविष्यात त्यांचा आकडा खूप वेगाने खाली येणार आहे. हे लोक आपल्याच पक्षाच्या पंतप्रधानांना मान देत नाहीत, असा जोरदार टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लगावला आहे.

(हेही वाचा – महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शाश्वत विकास उद्दिष्टांची आवश्यकता; Neelam Gorhe यांचे प्रतिपादन)

NDA च्या नेतेपदी निवड

लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वातील NDA ला बहुमत मिळाल्यानंतर शुक्रवार, 7 जून रोजी दिल्लीत संसदीय पक्षाची बैठक झाली. त्यात सर्वांनी एकमताने नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची नेतेपदी निवड केली. राजनाथ सिंह यांनी मांडलेल्या प्रस्तावाला एनडीएच्या नेत्यांनी समर्थन दिले आणि मोदींना पाठिंबा जाहीर केला. या वेळी बोलतांना नरेंद्र मोदी यांनी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला टोला लगावला.

ईव्हीएमने विरोधकांना गप्प केले

यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या जागा कमी झाल्यामुळे विरोधक सातत्याने टीका-टिप्पणी करत आहेत. त्या सर्व टीकांना पंतप्रधानांनी उत्तर दिले. पंतप्रधान पुढे म्हणाले की, “EVM वरून विरोधकांवर निशाणा निवडणुकीपूर्वी विरोधक सातत्याने ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत होते. याबाबत नरेंद्र मोदी म्हणाले की, “4 जूनपूर्वी हे लोक (इंडि आघाडी) सातत्याने ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. या लोकांचा भारतातील लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडाला होता. मात्र 4 जूनच्या संध्याकाळपर्यंत त्यांचे तोंड बंद झाले. ईव्हीएमने त्यांना गप्प केले. हीच भारताच्या लोकशाहीची ताकद आहे. आता मला विश्वास आहे की, पुढील 5 वर्षे कुणीही ईव्हीएमवर संशय घेणार नाही.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.