Viral Video : “गांधी परिवारातील सगळेच २४x७ राजकारणात होते, पण तुम्ही…”; गुलाम नबी आझाद यांचा व्हिडिओ व्हायरल

Viral Video : काँग्रेसचे माजी नेते व डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्षाचे प्रमुख गुलाम नबी आझाद यांचा एक व्हिडिओ(Viral Video) सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओत गुलाम नबी आझाद पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती करताना दिसून येत आहेत. महत्त्वाचे म्हणजे आझाद हे नेहमीच पंतप्रधान यांच्यावरील वक्तव्यांमुळे आणि त्यांच्या स्तुतीमुळे नेहमीच चर्चेत असतात.(Viral Video)

98

Viral Video : काँग्रेसचे माजी नेते व डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्षाचे प्रमुख गुलाम नबी आझाद यांचा एक व्हिडिओ(Viral Video) सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओत गुलाम नबी आझाद पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती करताना दिसून येत आहेत. महत्त्वाचे म्हणजे आझाद हे नेहमीच पंतप्रधान यांच्यावरील वक्तव्यांमुळे आणि त्यांच्या स्तुतीमुळे नेहमीच चर्चेत असतात.(Viral Video)

(हेही वाचा Anna University Case  :  चेन्नईतील १९ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला ३० वर्षांचा कारावास; वाचा संपूर्ण प्रकरण )

इंडिया टीव्ही चॅनलच्या ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात गुलाम नबी आझाद यांनी इंदिरा गांधींपासून ते नरेंद्र मोदींपर्यंतच्या सर्व गोष्टींबद्दल बोलले होते. जे आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत गुलाम नबी आझाद राजकारणाबद्दल खुमासदार भाष्य केले आहे. त्यांनी व्हिडीओ(Viral Video)त म्हटले आहे की, मी राहुल गांधींच्या विरोधात नाही, ते राजीव गांधींचे पुत्र आहेत, निरोगी राहा आणि पुढे जा. माझा त्यांच्यावर एकच राग आहे.

(हेही वाचा Air India Planes आता दुरुस्तीसाठी तुर्कीला जाणार नाहीत; Operation Sindoor नंतर पाकला मदत करणे भोवले )

ते म्हणाले, तुम्ही अशा गोष्टीला का धरून बसला आहात ज्यामध्ये तुम्हाला रस नाही? इंदिरा गांधी राजकारणात २४x७ होत्या. राजीव गांधी २४x७ होते, नेहरू २४x७ होते. पण हे २४ मिनिटेही नाहीत आणि मोदीजी २६x७ आहेत. मी भाजपच्या विचारसरणीचा नाही, पण मोदी एफ-१६ आहेत आणि तुम्ही रिक्षाही नाहीत. तुमच्या क्षमतेच्या बाहेर असेल ते सोडून द्या, ज्याला ते चालवायचे आहे त्याला द्या. परंतु, तुम्हालाच ते चालवायचे आहे आणि तुमच्यातच ते धाडसही नाही. हा लोभ आहे, असे गुलाम नबी आझाद व्हिडीओ(Viral Video)त बोलताना दिसून येत आहेत.

 

गुलाम नबी आझाद सर्वपक्षीय शिष्टमंडळाचा भाग

ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर, एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ विविध देशांना भेट देत आहे आणि सर्व देशांसमोर पाकिस्तानच्या दहशतवादाचा खरा चेहरा उघड करत आहे. गुलाम नबी आझाद या शिष्टमंडळाचा भाग आहेत. त्यांची प्रकृती अचानक बिघडली ज्यामुळे त्यांना कुवेतमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुलाम नबी आझाद यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.(Viral Video)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.