भाजपाच्या ठाणे लोकसभा प्रमुखपदी विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती

141
भाजपाच्या ठाणे लोकसभा प्रमुखपदी विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती
भाजपाच्या ठाणे लोकसभा प्रमुखपदी विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती

भाजपाच्या ठाणे लोकसभा प्रमुखपदी राज्यसभेचे माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवड नुकतीच जाहीर केली. त्याचबरोबर ठाणे लोकसभा अंतर्गत विधानसभा निवडणूक प्रमुख पदावरही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

(हेही वाचा – अशोक चव्हाणांची मजल २जी, ३ जी आणि सोनियाजी यांच्या पलीकडे गेलीच नाही; देवेंद्र फडणवीसांचा टोला)

माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वात ठाणे लोकसभा मतदारसंघात पक्षाची रणनीती ठरविण्यात येणार आहे. विधानसभा मतदारसंघातही निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखपदी आमदार निरंजन डावखरे, ओवळा-माजिवडा मतदारसंघाच्या प्रमुखपदी महापालिकेतील माजी गटनेते मनोहर डुंबरे, ठाणे मतदारसंघात माजी उपमहापौर सुभाष काळे, मिरा-भाईंदरमध्ये जिल्हाध्यक्ष रवी व्यास, ऐरोलीत सागर नाईक आणि बेलापूरमध्ये निलेश म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.