Sanjay Raut: आघाडीमध्ये पुन्हा बिघाडी! “भान ठेवून बोलावं…”, ठाकरे संजय राऊतांवर संतापले

302
Sanjay Raut: आघाडीमध्ये पुन्हा बिघाडी!
Sanjay Raut: आघाडीमध्ये पुन्हा बिघाडी! "भान ठेवून बोलावं...", ठाकरे संजय राऊतांवर संतापले

महाविकास आघाडीतील धुसफुस (Sanjay Raut) पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा बिघाडी होण्याची शक्यता आहे. नागपूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे (Vikas Thackeray) यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरची नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. आपण हाय कमांडकडे देखील याची तक्रार करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (Sanjay Raut)

… ही दुटप्पी भूमिका आहे

विकास ठाकरे म्हणाले, ” ‘सामना’मध्ये आज जे प्रकाशित झालं त्यावरून असं दिसतं की संजय राऊत (Sanjay Raut) आणि नितीन गडकरी यांच्यामध्ये प्रेम दिसतं. पण महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून बोलताना त्यांनी विचार करावा. गडकरींबद्दल प्रेम असेल तर ते त्यांच्या घरी जाऊन व्यक्त करा, लिखाण केल्यानं लोकांच्या मनात गैरसमज निर्माण होतो. भाजप विरोधात लिहितात आणि गडकरींवर प्रेम करतात, ही दुटप्पी भूमिका आहे. त्यांनी भान ठेवून बोलावं नाही तर बोलण्यास सगळेच मोकळे आहेत. मी हायकमांडसोबत यावर बोलणार आहे, भाजप विरोधात लढायचं की नाही हे विचारणार आहे.” असं ठाकरे यांनी म्हटलं आहे. (Sanjay Raut)

निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार करणार

दरम्यान, मॅाकपोलची मतं क्लिअर न करता नागपूरातील एका बुथवर मतदान झाल्याची बाब उघड झाली. यामुळे इकडची मतं तिकडे आणि तिकडची मते इकडे होण्याचा संशय आहे. याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार करणार असल्याचं देखील विकास ठाकरे यांनी म्हटलं आहे. (Sanjay Raut)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.