Vidhan Sabha Election : लोकसभेचे झालं विधानसभेचे काय ?; कोण राहील सोबत कोण जाईल सोडून ?

130
Vidhan Sabha Election : विधानसभेसाठी भाजपाकडून प्रभारींची नियुक्ती; भूपेंद्र यादव महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला जोरदार धक्का दिल्याचे पाहायला मिळत आहे. महायुतीला फक्त १७ जागा मिळवण्यात यश आले. तर महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १० जागांवर उमेदवार दिले होते. त्यापैकी ८ जागा मिळाल्या. एकूणच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचे नेते महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे चित्र आहे. कारण, विधानसभा निवडणुकीच्या जागांबाबत आता दावे-प्रतिदावे केले जात आहेत. (Vidhan Sabha Election)

विधानसभेसाठी दावे-प्रतिदावे

जयंत पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत भाष्य केले आहे. आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची शिकस्त केली. त्यामुळे आमचा ८० टक्के स्ट्राईक रेट राहिला. आम्ही दोन जागा अधिक लढवल्या असत्या तर अधिक जागा मिळाल्या असत्या. आगामी विधानसभा निवडणुकीत १८० पेक्षा अधिक आमदार आमचे निवडून येतील अशी आमची अपेक्षा आहे. विधानसभेला आता साडे तीन महिने आहेत, असा दावा जयंत पाटील यांनी केला. दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीत आम्ही १८० ते १८५ जागा सहज निवडून येऊ, असे भाकित संजय राऊतांनी केले आहे. (Vidhan Sabha Election)

तर महायुती कडून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर महाराष्ट्रात महायुतीच्या २०० जागा निवडून येतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यामागे त्यांचे स्वतःचे काही तर्क आहेत. (Vidhan Sabha Election)

(हेही वाचा – Narendra Modi: केरळमध्ये जम्मू-काश्मीरपेक्षाही जास्त अत्याचार; दाक्षिणात्य कार्यकर्त्यांचं कौतुक करत मोदी म्हणाले…)

कोण नक्की कोणाच्या संपर्कात ?

त्यातच शिवसेनेचे ५ ते ६ आमदार उबाठा गटाच्या संपर्कात असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे शिवसेनेत खळबळ निर्माण झाली आहे. माहितीनुसार, उबाठा गटाच्या संपर्कात असणाऱ्या त्या आमदारांचा लवकरच पक्षप्रवेशही होणार असून हे आमदार आपल्या हाती मशाल चिन्ह घेणार आहेत. त्यामुळे राजकीय समीकरण बदलणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मविआच्या बाजूने राज्यातील जनतेनं कौल देत महायुतीला हा मोठा धक्का ठरल्यानं शिवसेनेतील काही आमदार उबाठा गटाकडे परतणार असल्याचे सांगितले जात आहे. (Vidhan Sabha Election)

काय म्हणाले रोहित पवार

“अजित पवारांचे १९ आमदार शरद पवाराच्या संपर्कात असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. त्याचबरोबर त्यांच्या गटातील इतर १२ आमदार हे भाजपाच्या संपर्कात आहेत. ते काय करतील ते पुढच्या काही दिवसांत आपल्याला समजेल. परंतु, या १९ आमदारांपैकी कोणाला आमच्या पक्षात घ्यायचं आणि कोणाला घ्यायचं नाही हा निर्णय आमचे पक्षप्रमुख घेतील. आमचं त्यांना एकच सांगणं आहे की, पक्षाच्या अडचणीच्या काळात जे लोक आपल्याबरोबर निष्ठेने राहिले त्यांनाच पहिलं प्राधान्य द्यायला हवं. जे लोक स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष सोडून गेले त्या लोकांना, तसेच ज्यांना भाजपाने मारून-मुटकून, अडचणीत आणून तिकडे नेलं असेल त्यांना दुसरं प्राधान्य द्यावं. असं आम्हा सर्व कार्यकर्त्यांना वाटतं.” (Vidhan Sabha Election)

लोकसभेच्या निवडणुका संपल्या आरोप प्रत्यारोप आणि दावे प्रति-दावे आता होतच राहणार आहेत परंतु ते सत्यात किती उतरतात आणि कोणाचे सत्य निघतात हे तर येणाऱ्या विधानसभेच्या निकालानंतरच कळू शकते. (Vidhan Sabha Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.