Vidhan Parishad Election : विधानपरिषद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीकडून शिवाजीराव नलावडे

98
Vidhan Parishad Election : विधानपरिषद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीकडून शिवाजीराव नलावडे

विधानपरिषदेच्या ४ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी दोन जागांवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने उमेदवारांची घोषणा केली आहे. मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघासाठी ही निवडणूक होत आहे. महायुतीतील मनसेनंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. (Vidhan Parishad Election)

मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवाजीराव नलावडे यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दंड थोपटले आहेत. पण यामुळे मात्र, भाजपासाठी मोठे संकट निर्माण झाले असल्याचे बोलले जात आहे. कारण कोकण पदवीधरसाठी भाजपाकडून पुन्हा एकदा निरंजन डावखरे यांना संधी देण्यात येणार होती. परंतु, मनसेने उमेदवार दिल्याने डावखरे यांचा पत्ता कट झाला आहे. पण आता मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवार दिल्याने याबाबत भाजपा काय मत व्यक्त करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Vidhan Parishad Election)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : कॅप्टन अमरिंदर सिंग पंजाबच्या निवडणूक प्रचारातून गायब)

महत्त्वाची बाब म्हणजे, सोमवारी मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकींच्या जागा वाटपाचा मुद्दा उपस्थित करत भाजपाला सांगा की, ८० ते ९० जागा मिळाल्याचा पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका घेतली. त्यानंतर अजितदादांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची सोमवारी रात्री ८ वाजता मुंबईतील देवगिरी बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. (Vidhan Parishad Election)

ठाकरे गटाने कोकण पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवार घोषित केले आहेत. तर मनसेकडूनही कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने देखील उमेदवार घोषित केल्यामुळे भाजपाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (Vidhan Parishad Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.