हिंसाचारप्रकरणी पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी VHP उतरणार रस्त्यावर

विश्व हिंदू परिषद नोव्हेंबर महिन्यात हितचिंतक अभियान हाती घेणार आहे. ज्याचे उद्दिष्ट १ कोटींहून अधिक हिंदूंना VHP मध्ये नोंदणी करणे आहे, असे VHP चे मिलिंद परांडे म्हणाले.

163

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करण्याच्या बहाण्याने हिंदूंवरील हिंसाचाराची चिंताजनक पातळी पाहता, विहिंपने (VHP) 19 एप्रिल रोजी देशातील सर्व जिल्हा ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीसाठी निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती विहिंपचे संघटनमंत्री मिलिंद परांडे यांनी दिली.

गोवा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना परांडे म्हणाले, प्रयागराज येथील कुंभमेळ्यादरम्यान झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या (VHP) बैठकीत, संघटनेने देशव्यापी जागरूकता मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला. या मोहिमेचा उ‌द्देश मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करणे, हिंदू धार्मिक संस्थांना अधिक स्वायत्तता देणे हा आहे. विश्व हिंदू परिषद नोव्हेंबर महिन्यात हितचिंतक अभियान हाती घेणार आहे. ज्याचे उद्दिष्ट १ कोटींहून अधिक हिंदूंना VHP मध्ये नोंदणी करणे आहे. येत्या 1-2 वर्षात समाजातील वंचित घटकांसाठी शिक्षण, आरोग्य किंवा रोजगाराच्या क्षेत्रात सेवा प्रकल्प राबविण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही ते म्हणाले.

(हेही वाचा Murshidabad Violence नंतर मानवाधिकारवाल्यांच्या वॉलवर शुकशुकाट)

VHP आधीच 5500 हून अधिक सेवा प्रकल्प चालवत आहे ज्याचा देशभरातील लाखो लोकांना फायदा होत आहे आणि हिंदूंना सक्षम बनवले जात आहे. देशातील हिंदू लोकसंख्येतील असंतुलन संपूर्ण देशासाठी धोकादायक आहे. गोव्याचे माननीय राज्यपाल यांनीही राज्यातील अशाच परिस्थितीचा उल्लेख केला आहे. त्यांनी गोव्यात ख्रिश्चन लोकसंख्येच्या टक्केवारीत मोठी घट झाल्याचा उल्लेख केला होता. तसेच मुस्लिम लोकसंख्येच्या टक्केवारीतही चिंताजनक वाढ झाली आहे. खरोखरच आपण गोव्यातही त्याचे ज्वलंत उदाहरण पाहत आहोत, विविध राज्यांमधून गोव्यात अचानक मुस्लिमांचा जमाव येणे आणि विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये अशा मुस्लिमांचे पद्धतशीरपणे वसाहत करणे हे एक सुनियोजित षडयंत्र दर्शवते आणि अधिकाऱ्यांनी लोकसंख्येतील अशा असंतुलनाकडे लक्ष दिले पाहिजे कारण त्याचा निवडणुकीतील राजकीय निकालांवर परिणाम होऊ शकतो, असेही मिलिंद परांडे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.