-
खास प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला पाठिंबा दर्शवला असून पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांवर कारवाई करण्याची मागणी आंबेडकर यांनी केली आहे.
सरकारने ठोस पावले उचलावीत
मोदी सरकारला जाहीर पाठिंबा दर्शविण्यासाठी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सर्व राजकीय पक्षांना आणि सामान्य नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. पहलगाम हल्ल्याविरोधात सरकारने ठोस पावले उचलावीत, यासाठी एक दिवस शांततेत लाक्षणिक आणि प्रातिनिधिक भावना व्यक्त करण्यासाठी एक होऊया, अशा शब्दात आंबेडकर यांनी नागरिकांना साद घातली असून २ मे, २०२५ या दिवशी दुपारी २ वाजता हुतात्मा स्मारक, फोर्ट या ठिकाणी जमण्याचे आवाहन केले.
(हेही वाचा – IPL 2025, M S Dhoni : महेंद्रसिंग धोनी पुढील आयपीएल खेळणार का? सुरेश रैनाने काय उत्तर दिलं?)
पक्षाचा झेंडा न घेता या
यावेळी सह्यांची मोहीम राबवण्यात येणार आहे. ज्या नागरिकांना किंवा राजकीय पक्ष कार्यकर्त्यांना मोदी सरकारला पाठिंबा द्यायचा असेल त्यांनी सही करावी, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचाही झेंडा नसेल तसेच इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सहभागी होताना पक्षाचा झेंडा न घेता यावे, अशी अट मात्र आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी घातली आहे.
आंबेडकर यांचे कौतुक
मोदी सरकारवर कायम टीका करणारे प्रकाश आंबेडकर पहलगाम हल्ला प्रकरणी सरकारच्या पाठीशी ठाम उभे राहिल्याने सर्व स्तरातून आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे कौतुक होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community