Vanchit Bahujan Aghadi : वंचितच्या ‘त्या’ अटीमुळे मविआसोबत आघाडीची शक्यता मावळली

उबाठाचे नेते संजय राऊत यांनीही काही लोक भाजपाला साहाय्य होईल असे कृत्य करत आहेत, प्रकाश आंबेडकर हे चांगले पत्र लिहीत असतात, त्यांची पत्रे फक्त वाचायची असतात, अशा शब्दांत त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

193
लोकसभा निवडणुकीनंतर उबाठा गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट भाजपशी हातमिळवणी करणार नाही, असे लिहून देण्याची अट वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी घातली. ही अट दोन्ही गटाच्या नेत्यांनी स्पष्ट शब्दांत नाकारली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aghadi) लादण्यात येणाऱ्या अटी, पक्षाकडून तीन उमेदवारांची झालेली घोषणा यामुळे वंचितबरोचर आघाडी होण्याची शक्यता मावळली असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि बंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर होणाऱ्या चर्चेत तोडगा निघण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. वंचितने २७ जागांवर आमची ताकद असल्याचे आधी पत्र दिले. मात्र नक्की किती जागा हव्या आहेत हे स्पष्ट केलेले नाही.

वंचितने केल्या जागांवर दावा 

वंचितने (Vanchit Bahujan Aghadi) निवडणुकीला अल्पसंख्यांक आणि मागास प्रवर्गातील अधिक उमेदवार असावेत अशीही अट घातली आहे. वंचितने तीन उमेदवारांच्या नावांची घोषणाही केली. यापैकी वर्धा आणि सांगली या दोन मतदारसंघांवर काँग्रेसचा दावा आहे. वंचितची एकूण भूमिका लक्षात घेता महाविकास आघाडी आणि वंचितमध्ये समझोता होणे कठीण असल्याचे मानले जाते. काँग्रेस पक्षाच्या बैठकीत आज वंचितच्या भूमिकेवर चर्चा झाली. कोल्हापूर, सांगली, रामटेक आणि अमरावती या चार लोकसभा मतदारसंघांवरून काँग्रेस आणि शिवसेनेत सहमती होऊ शकलेली नाही. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज यांनी लढण्याची तयारी दर्शविली आहे. ही जागा शिवसेनेकडे होती. कोल्हापूर मिळणार नसल्यास सांगलीच्या जागेवर शिवसेनेने दावा केला आहे. विदर्भात अमरावती आणि रामटेक या दोन मतदारसंघांवर काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. काँग्रेस मंगळवारी त्यांच्या वाट्याला येणाऱ्या संभाव्य १९ मतदारसंघांचा आढावा घेतला. उबाठाचे नेते संजय राऊत यांनीही काही लोक भाजपाला साहाय्य होईल असे कृत्य करत आहेत, प्रकाश आंबेडकर हे चांगले पत्र लिहीत असतात, त्यांची पत्रे फक्त वाचायची असतात, अशा शब्दांत त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.