वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) मृत्यू प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे गेल्या सात दिवासांपासून फरार होते. आज (23 मे) सकाळी पहाटे 4.30 वाजता राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. या प्रकरणात वैष्णवीच्या (Vaishnavi Hagawane) सासू, पती आणि नणंद यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या तपासानंतर उघड झालेल्या अनेक धक्कादायक बाबींमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे. (Vaishnavi Hagawane)
हेही वाचा-Powai Lake मधील ‘या’ पक्ष्यांचा अधिवास धोक्यात; महापालिकेने स्वीकारले ‘हे’ धोरण
सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी (Vaishnavi Hagawane) शशांक हगवणे (वय 23) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी याआधीच अटक करण्यात आली होती. सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे गेल्या 7 दिवसांपासून फरार होते. त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली होती. त्यानंतर आज राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. (Vaishnavi Hagawane)
हेही वाचा- Nala Safai : पाऊस आला धावून, नाल्यातील गाळ गेला वाहून; यंदा मुंबईचे काही खरे नाही!
वैष्णवीचा तिच्या सासरी संशयास्पद मृत्यू झाला होता. प्राथमिक माहितीनुसार, तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता, असा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवून दिली असून, आता या संपूर्ण प्रकरणात न्यायासाठी मोठा आवाज उठवला जात आहे. (Vaishnavi Hagawane)
सध्या या प्रकरणात चौकशी अधिक वेगाने सुरु झाली असून, सर्व आरोपींविरुद्ध ठोस पुरावे गोळा करण्याचं काम पोलिसांकडून सुरु आहे. लवकरच या प्रकरणात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. (Vaishnavi Hagawane)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community