
-
प्रतिनिधी
मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेले राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गटामधून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाच्या शिस्तभंग कारवाईचा निर्णय घेत प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्या सहीने अधिकृत पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. (Vaishnavi Hagavane Suicide Case)
पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण गंभीर असून, संबंधितांवर गुन्हा दाखल असतानाही पक्षाच्या नीतिनियमांना धरून हे दोघेही पक्षात राहू शकत नाहीत, असा स्पष्ट निर्णय घेण्यात आला आहे. (Vaishnavi Hagavane Suicide Case)
(हेही वाचा – China – Pakistan – Afghanistan Come Together : चीन आणि पाकमधील आर्थिक कॉरिडॉरचा अफगाणिस्तान पर्यंत विस्तार)
राजकीय वर्तुळात या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू असून, पक्ष शिस्तीच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरत आहे. स्थानिक पातळीवर राजकीयदृष्ट्या सक्रिय असलेले राजेंद्र हगवणे यांना पक्षातून हाकलल्यामुळे मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातही उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Vaishnavi Hagavane Suicide Case)
वैष्णवी हगवणे यांचा मृत्यू प्रकरण पोलिस तपासाखाली असून, संबंधित घटनेचा तपशील उजेडात येईपर्यंत आरोप निश्चित झाले नसले तरी पक्षाने तत्काळ कारवाई करत ‘शून्य सहनशीलता धोरण’ पाळल्याचे या निर्णयावरून स्पष्ट होत आहे. (Vaishnavi Hagavane Suicide Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community