उत्तर प्रदेशात १७ Masjid, मदरशांवर चालणार बुलडोझर; नेपाळ सीमेवर सुरु आहे ‘लँड जिहाद’

१७ मशिदी-मदरशांपैकी १ मशीद आणि ८ मदरसे सदर तहसील क्षेत्रात आहेत, तर २ मशिदी (Masjid) आणि ६ मदरसे शोहरतगढ तहसील क्षेत्रात आहेत.

62

उत्तर प्रदेश सरकार बेकायदेशीर बांधकामांवर बांधलेल्या मशिदी (Masjid) आणि मदरशांवर सतत कारवाई करत आहे. दरम्यान, नेपाळ सीमेच्या आत १५ किलोमीटर अंतरावर बांधलेल्या १७ मशिदी (Masjid) आणि मदरसे पाडले जातील. या मशिदी (Masjid) आणि मदरसे सरकारी जमिनीवर बांधले आहेत. इथे एकप्रकारे लँड जिहाद सुरु आहे. याशिवाय, सरकारी जमिनीवरील ताबा रिकामा करण्यासाठी आणखी ६०८ लोकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. जर त्यांनी तसे केले नाही तर सरकार स्वतः त्यांचा ताबा काढून घेईल आणि त्यांच्यावर दंडही आकारेल.

प्रत्यक्षात, सरकार भारत-नेपाळ सीमेजवळील सरकारी जमिनीवरील अतिक्रमणांची चौकशी करत आहे. सिद्धार्थनगर जिल्ह्यात चौकशी केली असता, ६२५ ठिकाणी सरकारी जमिनीवर कब्जा करण्यात आल्याचे आढळून आले. यामध्ये ३ मशिदी  (Masjid) आणि १४ मदरशांचाही समावेश आहे. यातील काही मदरसे अर्धवट तर काही पूर्णपणे सरकारी जमिनीवर बांधलेले आहेत. या १७ मशिदी-मदरशांपैकी १ मशीद आणि ८ मदरसे सदर तहसील क्षेत्रात आहेत, तर २ मशिदी (Masjid) आणि ६ मदरसे शोहरतगढ तहसील क्षेत्रात आहेत.

(हेही वाचा Pahalgam Terror Attack ची टूलकिट सापडली; काय होती त्यात माहिती? जाणून घ्या… )

एकूण ६२५ अतिक्रमणांपैकी बहुतेक अतिक्रमणे शोहरतगढ तहसीलमध्ये आहेत. सरकारने सर्वांना नोटीस पाठवली आहे. यानंतरही जर लोकांनी अतिक्रमण काढले नाही तर सरकार त्यांच्यावर बुलडोझर चालवेल. नेपाळ सीमेवर सुमारे १५०० बेकायदेशीर मदरशांची माहिती आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.