Uttam Jankar: माढ्यात नवा ट्विस्ट! फडणवीसांच्या भेटीनंतर उत्तम जानकर शरद पवारांच्या भेटीला

126
Uttam Jankar: माढ्यात नवा ट्विस्ट! फडणवीसांच्या भेटीनंतर उत्तम जानकर शरद पवारांच्या भेटीला
Uttam Jankar: माढ्यात नवा ट्विस्ट! फडणवीसांच्या भेटीनंतर उत्तम जानकर शरद पवारांच्या भेटीला

माढा लोकसभा मतदारसंघाच्या (Madha Lok Sabha) निवडणुकीत माळशिरसमधील धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर (Uttam Jankar) यांचं महत्त्व वाढलं आहे.विशेष विमानाने नागपूरला जाऊन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेणाऱ्या उत्तम जानकर आज शरद पवारांची (Sharad Pawar ) भेट घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं उत्तम जानकर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. (Uttam Jankar)

शरद पवार यांची बाजू जाणून घेणार 

उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी आम्ही देवेंद्र फडणवीस यांची बाजू ऐकून घेतली आता शरद पवार यांची बाजू जाणून घेणार आहोत, असं म्हटलं. उत्तम जानकर १९ एप्रिलला त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत. धैर्यशील मोहिते पाटील देखील जानकर यांच्यासह भेटीसाठी दाखल झाले आहेत. (Uttam Jankar)

विशेष विमानाने फडणवीस यांच्या भेटीला

उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर प्रमुख कार्यकर्त्यांसह वेळापूर येथे बैठक घेतली होती. देवेंद्र फडणवीस यांनी खास विमान पाठवून नागपूर येथे चर्चा केली होती. त्या बैठकीनंतर जानकर यांनी आमदारकीचे आश्वासन दिले असल्याचं सांगितलं होतं. विधान परिषद किंवा विधानसभा, आता रान मोकळे तुम्ही मागाल ते देऊ असं आश्वास देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी सांगितलं होतं. (Uttam Jankar)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.