US President Donald Trump : रशिया-युक्रेन युध्द संपविल्याची भाषा करणारे आता राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यावर बरसले; म्हणाले…

US President Donald Trump : रशिया-युक्रेन युध्द संपविल्याची भाषा करणारे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता आपल्या विधानावरून पलटली मारली आहे. ट्रम्प(US President Donald Trump) यांच्या रशियासोबतचे डावपेच यशस्वी न झाल्याने आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना मुर्ख म्हणण्यास सुरूवात केली आहे.

100

US President Donald Trump : रशिया-युक्रेन युध्द संपविल्याची भाषा करणारे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता आपल्या विधानावरून पलटली मारली आहे. ट्रम्प(US President Donald Trump) यांच्या रशियासोबतचे डावपेच यशस्वी न झाल्याने आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना मुर्ख म्हणण्यास सुरूवात केली आहे. ट्रम्प म्हणाले, रशिया-युक्रेन युध्दात निष्पाप लोकांचे जीव गेले. पुतिन संपूर्ण युक्रेन हिसकावून घेऊ इच्छितात, अशा शब्दांत त्यांनी पुतिन यांना फटकारले आहे.(US President Donald Trump)

दरम्यान, युक्रेनमधील सुरू असलेल्या संघर्षावर टीका करताना ट्रम्प(US President Donald Trump) म्हणाले, अनावश्यकपणे अनेक लोकांना मारत असून ते केवळ सैनिकांपुरते मर्यादित नाही यावरही त्यांनी भर दिला. कोणत्याही कारणाशिवाय युक्रेनमधील शहरांमध्ये क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले जात आहेत असे सांगतानाच पुतिन यांना संपूर्ण युक्रेन हवा असून फक्त त्याचा एक भाग नाही, असा रशियााच दृष्टिकोन आहे. या महत्त्वाकांक्षेमुळे रशियाचा नाश होऊ शकतो, असा थेट इशारा ट्रम्प यांनी दिला.

(हेही वाचा फिफा विश्वचषकापूर्वी Saudi Arabia ने ७३ वर्षे जुनी दारूबंदी उठवली; शरिया कायद्याचे काय? )

ते पुढे म्हणाले, रशिया-युक्रेन युध्द हे जर मी अध्यक्ष असताना झाले असते तर कधीही सुरू झाले नसते. विशेष म्हणजे शांतता चर्चेबाबत पुतिन यांच्या बदलत्या वृत्तीबद्दल ट्रम्प सतत निराशा व्यक्त करत आहेत. पुतिन यांच्याबद्दलची त्यांची निराशा आता केवळ विधानांपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ते रशियावर काही व्यापारी निर्बंध लादण्याचा विचारही करत आहेत, असेही बोलले जात आहे. जवळपास ३ वर्षांपासून सुरू असलेला रशिया-युक्रेन संघर्ष क्षणार्धात संपविण्याचा दावा करणारे डोनाल्ड ट्रम्प(US President Donald Trump) आता संतापलेले दिसत आहेत.

रविवार, २५ मे २०२५ रोजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल नेटवर्किंग साईट ट्रुथवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी माझे नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत. पण, कदाचित त्यांच्यासोबत काहीतरी घडले असेल ज्यामुळे ते मूर्ख झाले आहेत. ते युक्रेनियन सैनिकांवरच नाही तर तेथील नागरिकांवरही हल्ले करत आहे. मी नेहमीच म्हटले आहे की, पुतिन यांना फक्त एक प्रदेश नाही तर संपूर्ण युक्रेन काबीज करायचा आहे. परंतु, जर त्यांनी असे केले तर ते रशियाच्या पतनास कारणीभूत ठरेल, असा इशाराच ट्रम्प यांनी यावेळी दिला.(US President Donald Trump)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.