UNSC meeting : भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत बंद दाराआड झाली चर्चा ; बैठकीत काय झाले? पाकच्या राजदुताने सांगितले …

UNSC meeting : भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत बंद दाराआड झाली चर्चा ; बैठकीत काय झाले? पाकच्या राजदुताने सांगितले ...

145
UNSC meeting : भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत बंद दाराआड झाली चर्चा ; बैठकीत काय झाले? पाकच्या राजदुताने सांगितले ...
UNSC meeting : भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत बंद दाराआड झाली चर्चा ; बैठकीत काय झाले? पाकच्या राजदुताने सांगितले ...

२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावावर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC meeting) आयोजित करण्यात आली होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, भारताने सिंधू जल करार निलंबित करण्यासह, प्रादेशिक घडामोडींबद्दल संयुक्त राष्ट्रांना माहिती देणार असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने सांगितले होते. (UNSC meeting)

बैठकीत काय झाले?
या बैठकीत संभाव्यपणे दोन्ही देशातील तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांवर चर्चा झाली. त्यानंतर यूएनमध्ये एक पत्रकार परिषद घेत पाकिस्तानी दूत असीम इफ्तिखार यांनी यूनएससीच्या बैठकीत जे पाहिजे होते, ते मिळाले असं विधान केले. या बैठकीत पाकिस्तानने जम्मू – काश्मीर वाद सोडवण्यावरही चर्चा झाल्याची माहिती दिली. (UNSC meeting)

घाबरलेल्या पाकची संयुक्त राष्ट्रसंघात धावाधाव
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या सैन्य कारवाईच्या भीतीने पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक बोलावण्याची मागणी केली. या बैठकीत सुरक्षा परिषदेने भारताला संयम बाळगण्याचा सल्ला द्यावा असा प्रयत्न पाकिस्तानचा होता. ही बैठक UNSC च्या चेंबरमध्ये नाही तर कंसल्टेशन रुममध्ये आयोजित करण्यात आली होती. पाकिस्तानने या बैठकीची विनंती केली होती जेणेकरून दक्षिण आशियात निर्माण होणारा संघर्ष टाळता येईल. (UNSC meeting)

पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताकडून लष्करी कारवाई होणार आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननेच घाईघाईने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची बैठक बोलावण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर सुरक्षा परिषदेची बैठक बोलावून भारताला संयम बाळगण्याचे सांगितले. परंतु ही बैठक सभागृहात नाही तर चेंबरमध्ये झाली. भारत-पाकिस्तान मुद्यावर संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीबाबत युएनकडून अद्याप काहीच माहिती देण्यात आली नाही. (UNSC meeting)

असीम इफ्तिखार काय म्हणाले ?
पाकिस्तानचे राजदूत असीम इफ्तिखार यांनी बैठकीनंतर सांगितले की, “सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार आणि काश्मिरी लोकांच्या इच्छेनुसार जम्मू आणि काश्मीर वादासह सर्व मुद्दे शांततापूर्ण मार्गाने सोडवण्याची गरज ओळखली. प्रादेशिक स्थिरता एकतर्फी राखता येत नाही, हे देखील स्पष्टपणे मान्य करण्यात आले. तसेच आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन आवश्यक आहे,” असे ठरल्याचे इफ्तिखार यांनी सांगितले. (UNSC meeting)

शहबाज शरीफ यांनी दोनदा यूएन चीफशी केली चर्चा
२२ एप्रिल पहलगाम हल्ल्यानंतर २३ एप्रिलला भारताने ५ घोषणा केल्या. ज्यात सिंधु जल कराराला स्थगिती देण्यात आली. या निर्णयामुळे पाकिस्तानात पाण्याची मोठी समस्या उभी राहण्याची शक्यता आहे. त्यातून पाकिस्तानला आर्थिक नुकसान होईल. त्याशिवाय शहबाज शरीफ सरकारने यूएनकडे हस्तक्षेप करण्याचं आवाहन केले आहे. भारताच्या कठोर इशाऱ्यानंतर शहबाज शरीफ दोनदा यूएन प्रमुखांशी बोलले आहेत. सुरक्षा परिषदेच्या बैठकीपूर्वीही त्यांनी प्रमुख एंटोनिया गुटेरेस यांच्याशी फोनवरून संवाद साधला. भारताने आतापर्यंत पाकिस्तानला आर्थिक नुकसान होण्याचा मार्ग पत्करला आहे असं त्यांनी गुटेरेस यांना म्हटलं. (UNSC meeting)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.