
छत्तीसगडमधील (Chhattisgarh Naxalism) बिजापूरमध्ये २२ नक्षलवाद्यांना अटक केल्याबद्दल आणि सुकमा जिल्ह्यात ३३ नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणाबद्दल केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी सुरक्षा दलांचे आणि छत्तीसगड पोलिसांचे अभिनंदन केले आहे. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात (Bijapur District) विविध कारवाईत, कोब्रा कमांडो आणि छत्तीसगड पोलिसांनी २२ नक्षलवाद्यांना आधुनिक शस्त्रे आणि स्फोटक साहित्यासह अटक केली. (Amit Shah)
(हेही वाचा – भारतीय विद्यार्थीनीचा अमेरिकेत Hit and Run अपघातात मृत्यू ! स्वप्नपूर्ती होण्याआधीच …)
सुकमामध्ये ३३ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आणि मोदी सरकारच्या आत्मसमर्पण धोरणावर विश्वास व्यक्त केला. सुकमाच्या बडेसेट्टी पंचायतमध्ये ११ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, ती पहिली नक्षल सदस्य मुक्त पंचायत (इलवाड पंचायत) बनली. अमित शाह यांनी पुन्हा एकदा सांगितले की, ३१ मार्च २०२६ पूर्वी आपण देशाला नक्षलवादाच्या विळख्यातून मुक्त करण्याचा दृढनिश्चय केला आहे.
छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये २२ नक्षलवाद्यांच्या अटकेबद्दल आणि सुकमा जिल्ह्यात ३३ नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणाबद्दल केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात विविध कारवायांमध्ये कोब्रा कमांडो आणि छत्तीसगड पोलिसांनी २२ कुख्यात नक्षलवाद्यांना आधुनिक शस्त्रे आणि स्फोटक साहित्यासह अटक केली आहे. तसेच ते म्हणाले की, सुकमामध्ये आत्मसमर्पण करून ३३ नक्षलवाद्यांनी मोदी सरकारच्या आत्मसमर्पण धोरणावर विश्वास व्यक्त केला आहे.
(हेही वाचा – उद्धव आणि राज एकत्र येणार? Uddhav Thackeray यांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर चर्चेला उधाण)
अमित शाह म्हणाले की, सुकमाच्या बडेसेट्टी पंचायतीत 11 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याने ही पहिली नक्षलवाद मुक्त पंचायत (Ilwad Panchayat) बनली आहे. तसेच, सुकमामध्ये २२ इतर नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, त्यामुळे एकूण आत्मसमर्पण करणाऱ्यांची संख्या ३३ झाली आहे.
गृहमंत्र्यांनी लपून बसलेल्या नक्षलवाद्यांना मोदी सरकारच्या आत्मसमर्पणाच्या धोरणाचा अवलंब करून शस्त्रे टाकून शक्य तितक्या लवकर मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, ३१ मार्च २०२६ पूर्वी आपण देशाला नक्षलवादाच्या विळख्यातून मुक्त करण्याचा दृढनिश्चय केला आहे. नक्षलमुक्त भारत मोहिमेच्या या यशाबद्दल गृहमंत्र्यांनी सुरक्षा दलाचे कर्मचारी आणि छत्तीसगड पोलिसांचे अभिनंदन केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community