‘आता बास झालं, तुमची वेळ संपली…’, अमित शहांनी गृहमंत्र्याला झापले! पहा व्हिडिओ

98

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली देशातील सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांचे दोन दिवसीय चिंतन शिबीर राबवण्यात येत आहे. या शिबिरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हरियाणाच्या गृहमंत्र्यांचे चालू भाषण थांबवले आणि त्यांना भाषणाची वेळ संपल्याची आठवण करुन दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहे.

हरियाणाचे गृहमंत्री अनिल वीज हे या चिंतन शिबिरात भाषण करत होते. प्रत्येक राज्याच्या गृहमंत्र्यांना स्वागत भाषणासाठी पाच मिनिटे वेळ देण्यात आली होती. यावेळी हरियाणाचे गृहमंत्री वीज यांनी तब्बल साडे आठ मिनिटे भाषण केले. त्यामुळे त्यांच्यापासून काही अंतरावरच असलेल्या अमित शहा यांनी त्यांनी चिठ्ठी पाठवत आपले भाषण आटोपते घेण्यास सांगितले. पण तरीही वीज हे हरियाणामधील हरितक्रांती,राज्याचा इतिहास आणि इतर विकासकामांबाबत माहिती देत होते.

(हेही वाचाः अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक रद्द होणार? निवडणूक आयोग काय करणार)

अमित शहांनी केली सूचना

त्यानंतर अमित शहा यांनी वीज यांना, ‘हे स्वागताचे भाषण असून ते लवकर आटोपून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. तुम्हाला पाच मिनिटे दिली होती पण साडे आठ मिनिटे झाली तरी आपण बोलत आहात. त्यामुळे आपण सर्वांचे स्वागत करुन आपले भाषण थांबवा जेणेकरुन कार्यक्रम पुढे जाईल.’, अशी सूचना केली.

आता बास झालं…

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या या सूचनेनंतरही वीज यांनी आपले भाषण थांबवले नाही. त्यामुळे अखेर पुन्हा एकदा अमित शहा यांनी हस्तक्षेप करत, ‘इथे वेळेनुसार चालणे गरजेचे आहे. आपले भाषण थांबवा आता बास झाले, आपले खूप खूप आभार’ असे म्हणत अनिल वीज यांना भाषण थांबवण्यास सांगितले. अनिल वीज यांनी अतिरिक्त वेळ भाषण केल्यामुळे हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर यांना अवघ्या साडेतीन मिनिटांत आपले भाषण आटोपते घ्यावे लागले.

(हेही वाचाः देशातील दहशतवादी कारवायांमध्ये झाली इतकी घट, गृहमंत्री अमित शहांनी दिली माहिती)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.