जर कुणी भ्याड हल्ला करून आपला मोठा विजय झालाय असं समजत असेल तर एक गोष्ट ध्यानात घ्या की हे मोदी सरकार आहे, कुणालाही सोडणार नाही, असा गर्भित इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(amit shah) यांनी अप्रत्यक्षरित्या पाकिस्तान दिला. देशाच्या प्रत्येक इंच भूमीवरून दहशतवाद उखडून टाकण्याचा केंद्र सरकारचा संकल्प असून तो पूर्ण होईल, असेही अमित शाह(amit shah) यांनी यावेळी सांगितले.
दहशतवादाविरुध्दच्या लढाईत केवळ १४० कोटी भारतीयच नव्हे तर संपूर्ण जग भारतासोबत उभे आहे. तसेच, जगातील सर्व देश एकत्र आले असून दहशतवादाविरुध्दच्या या लढाईत भारतीयांच्या पाठीशी उभे आहेत. जोपर्यंत दहशतवादाचा नाश होत नाही तोपर्यंत आमची लढाई सुरूच राहील आणि ज्यांनी हे केले आहे त्यांना नक्कीच योग्य शिक्षा दिली जाईल, असा सज्जड इशाराच केंद्रीय मंत्री अमित शाह(amit shah) यांनी दिला.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युध्दाभ्यास सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्याने कडक कारवाईचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. चुन चुनके बदला लेंगे, जवाब भी दिया जायेगा. दहशतवादाविरोधात केंद्र सरकारने झीरो टॉलोरंस पॉलिसी आणली असून यामाध्यमातून समूळ नायनाट केला जाणार आहे. केंद्र सरकारने पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत दहशतवादाविरोधात कारवाई करण्यासाठी कठोर पाऊले उचलण्यासंदर्भात निर्णय झाला आहे.(amit shah)
Join Our WhatsApp Community