Union Cabinet : राणे, कराड यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान का नाही मिळाले?

299
Union Cabinet : राणे, कराड यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान का नाही मिळाले?

राज्यातील नारायण राणे आणि भागवत कराड या दोन मंत्र्यांना यावेळी नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. यावरून उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. मात्र दोघांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्यामागे भाजपाचा वेगळा विचार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (Union Cabinet)

गेल्या मंत्रिमंडळात राणे यांच्याकडे लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग खात्याचा कार्यभार होता तर कराड यांच्याकडे अर्थ राज्यमंत्री पदाची जबाबदारी होती. लोकसभा निवडणुकीत हे दोन्ही मंत्री निवडून आले, मात्र राज्यातील सहा मंत्र्यांनी काल रविवारी (९ जूनला) नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र राणे आणि कराड यांना पुन्हा संधी देण्यात आली नाही. (Union Cabinet)

(हेही वाचा – Narendra Modi 3.0 : केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, महाराष्ट्रातील मंत्र्यांकडे कोणकोणती खाती?)

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राणे यांचे आमदार पुत्र नितेश यांना आगामी विधानसभेनंतर राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान देण्याचा विचार असल्याने पक्षाने नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीमंडळापासून दूर ठेवले. नितेश राणे दोन वेळा कणकवली विधानसभा मतदार संघातून निवडून आले असून चार महिन्यांनी होणारी विधानसभा निवडणूक ही त्यांची तिसरी निवडणूक असण्याची शक्यता आहे. राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यास नितेश यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान देण्याचा विचार पक्षाकडून करण्यात आल्याचे सांगण्यात आले. (Union Cabinet)

भागवत कराड हे ज्येष्ठ भाजापा नेते असून राज्यात प्रदेशाध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावाचा विचार असल्याचे बोलले जात आहे. आगामी विधानसभेआधी विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागी कराड यांची नियुक्ती करून त्यांच्याच नेतृत्वाखाली विधानसभेला सामोरे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Union Cabinet)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.