Ujjwal Nikam : पूनम महाजन उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात प्रचार करणार का? उज्ज्वल निकम म्हणाले…

174
Ujjwal Nikam: पूनम महाजन उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात प्रचार करणार का? उज्ज्वल निकम म्हणाले...

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी राजकारणात प्रवेश केला असून ते भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. भाजपा खासदार पूनम महाजन याच जागेवरून दोन वेळा निवडून आल्या आहेत, मात्र आता महाजन यांचे तिकीट कापले आहे. उत्तर मध्य मतदारसंघातून भाजपाने उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी घोषणेच्या दुसऱ्या दिवशी रविवारी, (२८ एप्रिल) त्यांनी मुंबादेवी मंदिराला भेट दिली. देवीचा आशीर्वाद घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. (Ujjwal Nikam)

ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना तिकीट मिळताच त्यांनी काम सुरू केले आहे. “मी पूनम महाजन यांना भेटेन आणि उत्तर-मध्य जागेबद्दल त्यांच्याशी चर्चा करेन”, असे त्यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ला सांगितले. मी त्यांना निवडणूक प्रचारात सहभागी होण्यास सांगेन. पक्ष पूनम महाजन यांना नवीन जबाबदारी देऊ शकतो, असे निकम म्हणाले.

(हेही वाचा – Firing in Kashmir: काश्मिरात २ ठिकाणी गोळीबार, व्हिलेज डिफेन्स गार्डचा सदस्य जखमी)

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट
मुंबादेवीला भेट दिल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली. वीर सावरकर यांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर ते चैत्यभूमीवर गेले. तेथे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी आदरांजली वाहिली.

लहानपणापासून वीर सावरकरांची पुस्तके वाचली…
‘हिंदुस्थान पोस्ट’ सोबत संवाद साधताना त्यांनी सांगितले की, मी राजकारणात नवीन आहे. मला कॉंग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्याविरुद्ध निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे. लोकसभा मतदारसंघातील माझे सहकारी मला पाठिंबा देत आहेत. या सर्व लोकांच्या पाठिंब्याच्या आधारे मी माझे राजकारण करेन. “मी लहानपणापासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुस्तके वाचली आहेत. मी त्यांचा इतिहास वाचत आलो आहे. वीर सावरकरांकडून खूप शिकण्यासारखे आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केले.

उज्ज्वल निकम यांची ओळख
राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक महत्त्वाची प्रकरणे लढवणारे विशेष ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम आता राजकारणात प्रवेश करणार आहेत. अंबरनाथ स्फोट प्रकरण उज्ज्वल निकम यांनी हाताळले होते. १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात या अनुभवाने त्यांना मदत केली. १३ मार्च १९९३ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमुळे मुंबई हादरली होती. बॉम्बस्फोट प्रकरणात पोलिसांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या १००हून अधिक साथीदारांना अटक केली. तत्कालीन सरकारने मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणासाठी निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त केले. त्यानंतर २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाबला फाशी देण्यात उज्ज्वल निकम याने महत्त्वाची भूमिका बजावली. २०१३च्या मुंबई सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यात विशेष सरकारी वकील म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. उज्ज्वल निकम यांना २०१६मध्ये प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.