गडचिरोलीत पूर आला म्हणून उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्ह केले असते! बावनकुळेंचा टोला

120
उद्धव ठाकरे सरकार असते, तर गडचिरोलीमध्ये पूर आल्यावर फेसबुक लाईव्ह केले असते, पण शिंदे आणि फडणवीस रात्रीच थेट गडचिरोलीत पोहोचले आणि तेथील पाहणी केली, असे म्हणत भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी टोला लगावला.

ओबीसी आरक्षणावर अडीच वर्षे झोपला होतात का 

भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर जोरदार टिका केली. वडेट्टीवार आणि भुजबळ हे  ओबीसी आरक्षणाबाबत अडीच वर्षे झोपले होते का? सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षे काहीच केले नाही. पहिला आयोग तयार केला त्यांना पैसे दिले नव्हते. भुजबळ आणि वडेट्टीवार मोर्चे काढत राहिले, ओबीसी आरक्षणाचा फुटबॅाल केला, अशी टीका बावनकुळे यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाने लाथाळल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने बांठीया आयोग नेमला. बांठीया आयोगाचे ९० टक्के काम महाविकास आघाडी सरकारमध्ये झाले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील सर्व निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय झाल्या आहेत. आता शिंदे -फडणवीस सरकारवर टीका करण्याचा अधिकार भुजबळ यांना नाही. हा डाटा राजकीय आरक्षणासाठी आहे. महाविकास आघाडी सरकार गेल्यामुळे भुजबळ बावचळले आहे, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली. शिंदे – फडणवीस सरकार ओबीसी सामाजाला नक्की न्याय देणार आहे. १९ जुलै रोजी सुनावणी आहे, त्यात योग्य बाजू मांडणार. मध्य प्रदेशच्या धर्तीवर रिपोर्ट तयार झाला आहे, मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यात ओबीसींना आरक्षण मिळेल, असेही बावनकुळे म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.