Thackeray Vs Shinde : “शिवसेनेचे नवे बॅनर युद्ध!; ‘मैत्री वाघाशी’, शिवसेना उबाठावर थेट हल्ला”

135
Thackeray Vs Shinde : "शिवसेनेचे नवे बॅनर युद्ध!; 'मैत्री वाघाशी', शिवसेना उबाठावर थेट हल्ला"
  • प्रतिनिधी

शिवसेनेकडून सदस्य नोंदणी मोहीमेस सुरुवात झाली असून त्यासाठी मुंबईसह राज्यभरात नवे आकर्षक बॅनर्स लावण्यात आले आहेत. मात्र या बॅनर्समधून थेट शिवसेना उबाठावर निशाणा साधण्यात आला आहे. “मैत्री धाग्याची नाही, मैत्री वाघाशी!” या ठळक ओळीतून शिवसेनेने शिवबंधनच्या माध्यमातून शिवसेना उबाठाच्या ‘शिवबंधन’ मोहिमेची खिल्ली उडवली आहे. (Thackeray Vs Shinde)

(हेही वाचा – Pakistan च्या महिला पत्रकाराने दाखवली स्वतःची औकात; लंडनमधील हॉटेलमध्ये आई-बहिणीवरून दिल्या शिव्या )

या बॅनर्समध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे फोटो असून, ‘खरी शिवसेना हीच’ असा संदेश देण्यात आला आहे. यामध्ये ‘शिवसेना म्हणजे विकास, कार्यक्षमतेचा वाघ, आणि खऱ्या विचारांची ताकद’ असा उल्लेख करून नव्या कार्यकर्त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न दिसून येतो. (Thackeray Vs Shinde)

(हेही वाचा – पुण्यात ‘Hit And Run’ ! भरधाव मर्सिडीज कारने दुचाकीस्वाराला उडवलं ; एकाचा मृत्यू , दोन जखमी)

शिवसेना उबाठाने यापूर्वी ‘शिवबंधन’ नावाने सदस्य नोंदणी अभियान राबवले होते. त्याच्या उत्तरादाखल शिवसेनेने ‘मैत्री वाघाशी’ अशी सुस्पष्ट टोलेबाजी करत सदस्य नोंदणी मोहीमेला आक्रमक सुरुवात दिली आहे. राजकीय वर्तुळात या बॅनर युद्धामुळे पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध शिवसेना उबाठा असा संघर्ष उफाळून येण्याची चिन्हे आहेत. स्थानिक पातळीवरून सुरू झालेली ही प्रचारफलकांची टक्कर, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. (Thackeray Vs Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.