‘मुस्लिम तुष्टीकरण’ छाप Congress च्या जाहिरनाम्याला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा

Uddhav Thackeray : इंडी आघाडीचे सरकार आल्यानंतर काँग्रेस जाहिरनाम्याचे सत्यात रूपांतर

230
‘मुस्लिम तुष्टीकरण’ छाप Congress च्या जाहिरनाम्याला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा

शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाची साथ सोडत काँग्रेससोबत ‘हात’मिळवणी केली. काँग्रेसच्या मुस्लिम तुष्टीकरणाचा ‘मोह’ ठाकरे यांनाही आवरता आला नाही आणि त्यांनी मुस्लिम समाजाला अमर्याद स्वातंत्र्य बहाल करणाऱ्या काँग्रेसच्या जाहिरनाम्याला उघड पाठिंबा देत इंडी आघाडी केंद्रात सत्तेत आल्यास या जाहिरनाम्याचे रूपांतर सत्यात उतरेल,’ असे आश्वासन मंगळवारी ९ एप्रिलला एका पत्रकार परिषदेत दिले. (Congress)

आज राज्यातील महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद शिवसेना उबाठाच्या ‘शिवालय’ या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, समाजवादी पक्षाचे नेते रईस शेख आणि अन्य घटक पक्षाचे नेते उपस्थित होते. (Congress)

‘वचननाम्या’चे वेगळेपण पुसले

पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे यांना जाहिरनाम्यावर प्रश्न केला असता शिवसेना उबाठाचा वेगळा ‘वचननामा’ असणार नाही, तर संयुक्त महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध होईल, असे सांगून शिवसेनेच्या ‘वचननाम्या’चे वेगळेपण पुसून टाकले. सगळे राजकीय पक्ष ‘जाहीरनामा’ हा शब्दप्रयोग वापरला जातो, मात्र शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाचे वेगळेपण जपत जनतेला प्रभावित करणारा आणि आपले आश्वासन म्हणजे जनतेला दिलेले ‘वचन’, या अर्थाने त्याला ‘वचननामा’ असे संबोधले. (Congress)

(हेही वाचा – ED Raids Tamilnadu : तमिळनाडूत अमली पदार्थ आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी द्रमुकच्या नेत्यांवर ईडीची छापेमारी)

वचननाम्याची आवश्यकता नाही

ठाकरे म्हणाले, “संपूर्ण देशासाठी काँग्रेसने एक उत्तम जाहीरनामा जाहीर केलेला आहे. सहाजिकच आहे, इंडीया (इंडी) आघाडीचे सरकार आल्यानंतर या जाहिरनाम्याचे सत्यात रूपांतर होईल,” अशी ग्वाहीच त्यांनी दिली. वचननाम्याबाबत बोलताना ते पुढे म्हणाले, “राज्याचे आमचे वेगळे विषय आहेत, त्याचा उल्लेख आम्ही महाविकास आघाडीच्या वेगळ्या जाहीरनाम्यात करूच. त्यामुळे आणखी वेगळ्या जाड-जूड, ज्याला आपण ‘वचननामा’ म्हणतो त्या वचननाम्याची आता काही आवश्यकता नाही.” (Congress)

‘मुस्लिम लीग’ची छाप

ठाकरे यांनी काँग्रेस जाहिरनाम्याला पाठिंबा देत त्याच्या अंमलबजावणीचा मनसुबा व्यक्त केला. यांचा अर्थ काँग्रेसच्या लोकसभा निवडणूक २०२४ जाहीरनामा अर्थात ‘न्याय पत्रा’त जी आश्वासने दिली गेली आहेत त्याला त्याची मूक संमती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील रविवारी काँग्रेस जाहिरनाम्यावर टीका करताना ‘मुस्लिम लीग’ची छाप असलेला जाहिरनामा असल्याचे म्हटले आहे. तसेच काँग्रेसकडे देशहिताची आणि विकासाची काही ध्येयधोरणे नाहीत, असेही सांगितले. (Congress)

मुसलमानांना अमर्याद स्वातंत्र्य

मुसलमानांचे लाड करणाऱ्या ज्या ज्या योजना, सवलती, कायदे काँग्रेसच्या काळात मागील ७० वर्षांपासून सुरु होत्या, त्या बहुतांश मोदी सरकारने बंद केल्या. परंतु काँग्रेसने मुसलमानांना आकर्षित करण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी पुन्हा मुसलमानांना बहाल करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले आहे. मुसलमानांना अमर्याद स्वातंत्र्य बहाल करण्याचा मनसुबा यामध्ये विशेष उल्लेख करावा लागेल म्हणजे मोदी सरकारने बनवलेले तीन कायदे (ज्यात तिहेरी तलाख, जातीय हिंसाचार विधेयक (मॉब लिंचिंग) यांचा समावेश आहे) रद्द करणे, मुसलमानांसाठी पर्सनल लॉ बोर्ड सुरू ठेवणे, तसेच धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली मुसलमानांना बऱ्याच सवलती देण्याचे आश्वासन काँग्रेसने (Congress) जाहीरनाम्यात दिले आहे. या सर्व बाबी काँग्रेसच्या न्याय पत्रात अल्पसंख्यांक देण्यात आलेल्या आश्वासनांमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये ९ प्रमुख मुद्दे आहेत. (Congress)

(हेही वाचा – Loksabha Election 2024 : दुसऱ्या टप्प्यात 1210 उमेदवार रिंगणात)

अल्पसंख्यांकांचे अधिकार कायम

त्यात म्हटले आहे की, संविधान अनुच्छेद १५, १६, २५, २८, २९ आणि ३० अंतर्गत अल्पसंख्यांकांना जे अधिकार देण्यात आले आहेत, ते सर्व कायम ठेवले जातील. तसेच अनुच्छेद १५, १६, २९ आणि ३० अंतर्गत देण्यात आलेले सर्व अधिकार यांचा आदर करेल. संविधानातील अनुच्छेद १५ अंतर्गत नियम २ म्हणतो की, कोणत्याही भारतीय नागरिकाला जात, धर्म, लिंग, जन्मस्थान आणि वंश या आधारावर दुकान, हॉटेल, सार्वजनिक भोजनालय, सार्वजनिक मनोरंजन स्थळ येथे जाण्यापासून प्रतिबंध केले जाणार नाही, असे या जाहीरनाम्यात म्हटले आहे. (Congress)

‘हलाल’ला कायदेशीर संरक्षण

याशिवाय शाळा-महाविद्यालयात बुरखा आणि हिजाब घालण्यास अनुमती मिळणार आहे. भाषा आणि अन्न यामधील स्वातंत्र्य बहाल करण्याचाही शब्द काँग्रेसने दिला आहे, त्यामुळे ‘हलाल’ला कायदेशीर संरक्षण मिळण्याची शक्यता आहे. मुस्लिमांना कर्ज देण्यासाठी सोपे धोरण बनवण्याबाबत काँग्रेसने आश्वासित केले आहे. यासोबतच काँग्रेसने (Congress) अल्पसंख्याकांना शिक्षण, आरोग्य, सरकारी नोकऱ्या, सार्वजनिक बांधकाम कंत्राटे, कौशल्य विकास, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये योग्य संधी देण्याबाबत आश्वासन दिले आहे. (Congress)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.