Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांची मानसिक तपासणी करण्याची गरज आहे का ?

गणपत गायकवाड यांचा पोलीस स्टेशनमधील व्हिडिओ समोर आला, मॉरीस सोबतचा व्हिडिओ फेसबुक लाईव्हवर होता. अभिषेकला गोळ्या झाडताना दिसतंय पण कोणी गोळ्या घातल्या, याचा व्हिडिओ अजून समोर आलेला नाही.

211
Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांची मानसिक तपासणी करण्याची गरज आहे का ?

महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांची मानसिक तपासणी करण्याची गरज आहे का ? असा प्रश्न निर्माण होत आहे. आपल्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का ? असा प्रश्न विचारावासा वाटत आहे. कारण एक हत्या होत असताना त्याची बरोबरी श्वानासोबत केली जात आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

(हेही वाचा – Uddhav Thackeray : अभिषेक घोसाळकर आणि मॉरिशला दुसऱ्या कुणी तरी गोळ्या झाडल्या का? उद्धव ठाकरेंचा यांचा सवाल)

हत्त्या करणाऱ्याने नक्की आत्महत्या केली का ?

महाराष्ट्रात सरकारच्या आशिर्वादाने गुंडगिरी चालू आहे. हे सरकारमधील गँगवॉर आहे. गुंडांचे मुख्यमंत्र्यांसोबतचे फोटो आणि त्यांना दिलं जाणारं संरक्षण हा चिंतेचा विषय आहे. आमचा कार्यकर्ता अभिषेक घोसाळकर याची हत्या झाली. ज्याने हत्या केली असं सांगितलं जातं, तो गुंड होता, नंतर त्याने आत्महत्या केली. सूडभावना टोकाची भावना असेल असं आपण मानू, पण त्याने आत्महत्या का केली ? असा सवाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपस्थित केला.

दोघांना मारण्याची सुपारी कोणी दिलेली का हा प्रश्न उपस्थित होतो –

गणपत गायकवाड यांचा पोलीस स्टेशनमधील व्हिडिओ समोर आला, मॉरीस सोबतचा व्हिडिओ फेसबुक लाईव्हवर होता. अभिषेकला गोळ्या झाडताना दिसतंय पण कोणी गोळ्या घातल्या, याचा व्हिडिओ अजून समोर आलेला नाही. त्या मॉरीसने बॉडीगार्ड नेमला होता, अभिषेकवर गोळ्या कोणी चालवल्या, दोघांना मारण्याची सुपारी कोणी दिलेली का हा प्रश्न उपस्थित होतो, असंही ठाकरे(Uddhav Thackeray) म्हणाले.

(हेही वाचा – Ravindra Jadeja : रवींद्र जडेजा आणि वडिलांमधील वाद नेमका काय आहे?)

मुख्यमंत्री स्वतःच गुंडाला पोसत आहेत –

आधीचे राज्यपाल कोश्यारी जास्तच कर्तव्यदक्ष होते, त्यांच्यासोबतच त्या गुंडाच्या (मॉरीस) सत्काराचा फोटो समोर आला आहे. गणपती विसर्जनावेळी एका आमदाराने गोळीबार केला, त्याला क्लीन चिट दिली. दहिसरजवळच्या आमदाराच्या मुलाने एका तरुणाचं अपहरण केलं होतं, ठाण्यात एका तरुणीच्या अंगावर गाडी घालणारा भाजप कार्यकर्ता होता, अशी उदाहरणंच ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सांगितली.

(हेही वाचा – Ind vs Eng Test Series : श्रेयस अय्यर उर्वरित तीनही कसोटींना मुकण्याची शक्यता)

आता माझ्याकडे शब्द उरले नाहीत – उद्धव ठाकरे

काल (शुक्रवार ९ फेब्रुवारी) पुण्यात पत्रकार निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, असीम सरोदे यांच्यावर हल्ला झाला. रश्मी शुक्ला यांचं जनतेला पत्र समोर आलंय, पोलीस प्रमुखांनी असं पत्र कुणाला लिहिलं नव्हतं. देवेंद्र फडणवीस यांना मी कलंक बोललो, फडतूस बोललो, पण आता माझ्याकडे शब्द उरले नाहीत. त्यांची मानसिक तपासणी करण्याची गरज आहे का असं वाटतं. महाराष्ट्राला मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का असा प्रश्न निर्माण होत आहे. मुख्यमंत्री स्वतःच गुंडाला पोसत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.