Uddhav Thackeray आधुनिक युगातील औरंगजेब; खासदार नरेश म्हस्के यांची टीका

अधिवेशनात देशाला उत्तम गाणे मिळाल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला होता. यावर आता शिंदे गटाने जोरदार प्रतिहल्ला केला.

83
ममता बॅनर्जींचे सरकार बरखास्त करा! शिवसेना खासदार Naresh Mhaske यांची मागणी

स्टँड अप कॉमेडिअन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी विडंबनाचे गाणे गायले, त्यानंतर मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरू झाला. आता उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पत्रकार परिषद घेत कामरा चुकीचे काही बोलला नसल्याचे म्हणत त्याला पाठिंबा दिला आहे. तसेच अधिवेशनात देशाला उत्तम गाणे मिळाल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला होता. यावर आता शिंदे गटाची जोरदार प्रतिहल्ला केला.

अधिवेशनाने देशाला उत्तम गाणे दिले मान्य करावे लागेल. उद्धव ठाकरे हे आधुनिक जगातले औरंगजेब आहेत अशी गंभीर टीका शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. बाळासाहेबांना शेवटच्या दिवसांत त्यांनी किती त्रास दिला हे सगळ्यांना माहित आहे. राज ठाकरे त्याबाबत अनेकदा बोलले आहेत. औरंगजेबाने सत्तेसाठी आपल्या भावांचा काटा काढला. उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वेगळे काय केले? असा सवाल म्हस्के यांनी उपस्थित केला. तसेच ठाकरेंनी आपल्या सख्ख्या भावांना पद्धतशीरपणे दूर केले. बाळासाहेबांची वैचारिक संपत्ती त्यांनी सोडली. पण इतर प्रॉपर्टीसाठी भावासोबत दावा मांडला. हा दावा न्यायालयात गेला. बाळासाहेबांना अखेरच्या दिवसांत त्यांनी त्रास दिलाच, पण त्यांच्या निधनानंतर शिवसेनेच्या दुष्मनांशी हातमिळवणी करून आताही यातना देत आहेत. जे भावाचे नाही झाले, ते जनतेचे काय होणार? असा टोला म्हस्के यांनी लगावला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.