शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेतेपदानंतर आता उपनेते पदाची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासहित ज्येष्ठ नेते खासदार गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांच्यावर उपनेतेपदाची जाबाबदारी सोपवली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने किशोरी पेडणेकर, दत्ता दळवी, कोल्हापूर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर यांच्यासह ज्योती ठाकरे, संजना घाडी, आशा मामेडी यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस निघालेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
पेडणेकर आणि कीर्तिकरांवर जबाबदारी
मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी पर्यायाने शिवसेनेसाठी ही निवडणूक म्हणजे अस्तित्त्वाची लढाई आहे. अशा परिस्थितीत मुंबईच्या भाजप नेत्यांच्या टीका, आरोपांना पेडणेकर तोडीस उत्तर देत आहेत. शिवसेनेसाठी मुंबईतून किल्ला लढवत आहेत. त्यामुळेच पेडणेकर यांना उपनेते पद देऊन बळ देण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community