Uddhav Thackeray : “मी इथे ‘मन की बात’ करायला आलो नाही”; ठाकरे यांनी साधला बारसू मधील नागरिकांशी संवाद

या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्थानिकांशी संवाद साधत सरकारवर टीका केली असून, आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचे सांगितले आहे.

172
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : "मी इथे 'मन की बात' करायला आलो नाही"; ठाकरे यांनी साधला बारसू मधील नागरिकांशी संवाद

गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाची जोरदार चर्चा सुरू आहे. कोकणातील राजापूर तालुक्यातील सोलगाव बारसू परिसरात क्रूड ऑईल रिफायनींग करण्यासाठी रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोलियमन उद्योग हा रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित असून या रिफायनरीच्या प्रकल्पासाठी माती परिक्षण करण्यास सुरुवात झाली. याला स्थानिक गावकऱ्यांनी जोरदार विरोध केला आहे. या माती परिक्षणावरून स्थानिक आणि पोलिसांमध्ये वाद सुरु आहे. या आंदोलनाला उद्धव ठाकरे गटाने पाठिंबा देत हे आंदोलन अधिक तीव्र केले असा आरोप सरकारकडून केला जात होता. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शनिवार ६ मे रोजी रत्नागिरीचा दौरा करत आहेत.

(हेही वाचा – Uddhav Thackeray : बारसू मधील ठाकरेंच्या सभेला परवानगी नाही!)

या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्थानिकांशी संवाद साधत सरकारवर टीका केली असून, आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचे सांगितले आहे.

हेही पहा – 

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“लोकांची डोकी फुटली तरी चालतील, कोकणातील लोक भिकारी झाले तरी चालतील. मात्र, रिफायनरी झाली पाहिजे, अशी शिंदे सरकारची भूमिका आहे. मात्र, जर बारसूमधील लोकांना रिफायनरी नको असेल तर इथे रिफायनरी होऊ देणार नाही. मात्र जर हुकूमशाहीने हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर हुकूमशाही मोडून टाकू. मी इथे मन की बात करायला आलो नाही, तर तुमची बाजू ऐकून घ्यायला आलो आहे. राख आम्हाला आणि रांगोळी तुम्हाला असे राख रांगोळी करणारे प्रकल्प आपल्याला नको. पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनाही लक्ष्य केलं. आमच्या सरकारमध्ये मंत्री असताना त्यांना (एकनाथ शिंदे) महाराष्ट्रातले तीन जिल्हेसुद्धा ओळखत नव्हते,” असे ते म्हणाले. (Uddhav Thackeray)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.