Uddhav Thackerayयांच्यावर कारवाई करण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा आदेश, कारण काय ? वाचा सविस्तर …

194
Uddhav Thackerayयांच्यावर कारवाई करण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा आदेश, कारण काय ? वाचा सविस्तर ...

आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने, महाराष्ट्र निवडणूक आयोगाला दिले आहेत. २० मे रोजी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडले. यामध्ये मुंबई आणि परिसरातील जागांचा समावेश होता. तेव्हा मतदान संथ गतीने होत आहे, असा आरोप करत उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. (Uddhav Thackeray)

यावर, उद्धव ठाकरे यांनी आचार संहितेचा भंग केल्याचे म्हणत मुंबई भाजपाचे अध्यक्ष अशिष शेलार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने, राज्य निवडणूक आयोगाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

ठाकरेंनी घेतली होती पत्रकार परिषद…
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्ये मतदान झाले. यातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात २० मे रोजी मुंबई आणि परिसरातील जागांवर मतदान होते. त्यावेळी मुंबईतील अनेक मतदान केंद्रांवर संथ गतीने मतदान सुरू होते. त्यामुळे अनेक मतदारांनी नाराजी व्यक्त करत मतदान न करताच माघारी फिरणे पसंत केले होते. हा सर्व गोंधळ उडालेला असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये ठाकरे यांनी निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले होते. त्याचबरोबरच ठाकरेंनी यांनी मतदारांनी कितीही उशीर झाला, तरी मतदान करावे असे आवाहन केले होते. (Uddhav Thackeray)

आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार
यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेवर भाजपाचे मुंबई अध्यक्ष अशिष शेलार यांनी आक्षेप घेतला होता. उद्धव ठाकरेंनी मतदानादिवशी मतदारांवर प्रभाव टाकल्याचा व आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. (Uddhav Thackeray)

निवडणूक आयोगाने अशिष शेलार यांच्या तक्रारीची दखल घेत संपूर्ण प्रकरणाचे तपशील मागवले होते. हे पुरावे तपासल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने, राज्य निवडणूक आयोगाला आदेश देत उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करायला सांगितले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.