Shivsena Eknath shinde : शिवसेना उबाठा व्यतिरिक्त इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेना प्रवेशाकडे कल

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनश्री भरडकर यांचाही शिवसेनेत प्रवेश

95
Shivsena Eknath shinde : शिवसेना उबाठा व्यतिरिक्त इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेना प्रवेशाकडे कल
Shivsena Eknath shinde : शिवसेना उबाठा व्यतिरिक्त इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेना प्रवेशाकडे कल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत उबाठा शिवसेनेतील पदाधिकारी व लोकप्रतिनिधी जाण्याचे प्रमाण अधिक असले तरी आता या पक्षात इतर पक्षातील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधीही प्रवेश करू लागले आहेत. शिवसेना उबाठा गटातील पदाधिकारी व्यतिरिक्त अन्य पक्षातील लोकप्रतिनिधींचा शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा कल वाढू लागला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत परळ वडाळा येथील काँग्रेसचे नगरसेवक सुनील मोरे आणि माजी नगरसेविका सुप्रिया मोरे यांनी ठाण्यातील सभेदरम्यान प्रवेश केला. नारायण राणे यांनी शिवसेना पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या आमदार कालिदास कोळंबकर यांच्यासोबत माजी नगरसेवक सुनील मोरे यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला होता. त्यानंतर आमदार कालिदास कोळंबकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, परंतु सुनील मोरे यांनी कोळंबकर यांच्यासोबत भाजपमध्ये न जाता काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला होता.

(हेही वाचा – Chandrayaan 3 : चांद्रयान ३ मोहीम होणार यशस्वी; कारण यंदाच्या यानाची ‘ही’ आहेत वैशिष्ट्ये?)

त्यामुळे कोळंबकर यांच्याप्रमाणे तळागाळातील जनतेत लोकप्रिय अशी सुनील मोरे यांची ख्याती असून मागील काही महिन्यांपासून मोरे यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न शिवसेना उबाठा गटाचा सुरु होता. काँग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी वर्षा गायकवाड यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी विविध विभागांमध्ये दावेदारी सांगण्यास सुरुवात केल्याने भविष्यातील वादावादी आणि स्पर्धा लक्षात घेता सुनील मोरे यांनी पत्नीसह शिवसेनेत प्रवेश केला.

या आधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका धनश्री भरडकर यांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजुन काही नगरसेवक हे शिवसेनेत प्रवेश करण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक व पदाधिकारी हे आधीच शिवसेना प्रवेशाच्या प्रतीक्षेत असून या व्यतिरिक्त आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व माजी लोकप्रतिनिधींचे प्रवेश सुरु असल्याचे दिसून येत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.