UBT Group : संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात उबाठा गटात रस्सीखेच

चार वेळा विजयी झालेल्या चंद्रकांत खैरे यांचा अवघ्या साडेचार हजार मतांनी पराभव झाला होता. खैरे-दानवे दोघेही संभाजीनगर लोकसभा मतदारसंघांमध्ये आपापली व्यक्तिगत ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.

231
Shiv Sena UBT चे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी राजकीय शत्रुत्व?

शिवसेनेच्या उबाठा गटाचे (UBT Group) माजी खासदार तथा नेते चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातील गटबाजी जगजाहीर आहे. मात्र, काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्‍वभूमीवर चंद्रकांत खैरे हे दानवे यांच्या मतदारसंघात आपली ताकद आजमावत आहेत. पैठण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे २०१९ साली दुसऱ्या क्रमांकावर असलेले उमेदवार माजी नागराध्यक्ष दत्ता गोर्डे, वैजापूर येथील वैद्यकीय व्यवसायिक डॉ. राजू डोंगरे व संभाजी नगर येथील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ व एशियन हॉस्पिटलचे संचालक डॉ. शोएब हाश्मी यांचा शिवसेना उबाठा (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते मंगळवारी (०६ फेब्रुवारी) मातोश्री येथे शिवबंधन बांधून पक्ष प्रवेश केला. (UBT Group)

याचे संपुर्ण श्रेय विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्याकडे जाते. त्यामुळेच आता खैरे आणि दानवे यांच्यामध्ये श्रेय वादाची लढाई पुन्हा दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भातही नुकतीच महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांची बैठक मुंबईत पार पडली. यामध्ये ठाकरे गटाच्यावतीने (UBT Group) संजय राऊत (Sanjay Raut) या बैठकीला उपस्थित होते. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत ठाकरे गटाच्या (UBT Group) उमेदवाराचा पराभव झाला होता. (UBT Group)

(हेही वाचा – Govt Recruitment Exams : सरकारी नोकर भरतीच्या परिक्षेत अफरातफर करणाऱ्याला १ कोटी दंड आणि १० वर्षांची शिक्षा)

चार वेळा विजयी झालेल्या चंद्रकांत खैरे यांचा अवघ्या साडेचार हजार मतांनी पराभव झाला होता. खैरे-दानवे दोघेही संभाजीनगर लोकसभा मतदारसंघांमध्ये आपापली व्यक्तिगत ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपलं मत कोणाच्या पारड्यात टाकतात हे देखील पाहणं औत्सुक्याचं असेल. परंतु आपापसातील या रस्सीखेच मुळे या ठिकाणी निवडणूक मात्र रंगणार असल्याचं बोललं जात आहे. (UBT Group)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.