
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर (Trump Tariffs) आणखी वाढले आहे. अमेरिकेने आता चीनवर आणखी १००% कर लादला आहे. यासह, चिनी वस्तूंवरील एकूण शुल्क २४५% पर्यंत वाढले आहे. चीनने ११ एप्रिल रोजी अमेरिकन वस्तूंवर १२५% कर लादला होता, त्याला प्रत्युत्तर म्हणून ट्रम्प यांनी नवीन कर लादला आहे. यापूर्वी चीनने म्हटले होते की आता ते अमेरिकेने लादलेल्या कोणत्याही अतिरिक्त शुल्काला प्रतिसाद देणार नाही. (Trump Tariffs)
अमेरिकेसोबतच्या वाढत्या टॅरिफ (Trump Tariffs) वादाच्या पार्श्वभूमीवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पहिल्यांदाच विधान केले आहे. ते म्हणाले की, ‘चीन कोणालाही घाबरत नाही. गेल्या ७० वर्षात चीनचा विकास हा कठोर परिश्रम आणि स्वावलंबनाचा परिणाम आहे. अमेरिकेने लादलेले असामान्य शुल्क आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यापार नियमांचे गंभीर उल्लंघन करते. हे दबाव आणि धमकीचे पूर्णपणे एकतर्फी धोरण आहे. जर अमेरिका ‘टॅरिफ नंबर गेम’ खेळत राहिली तर आम्ही त्यांच्याकडे लक्ष देणार नाही.’ असं शी जिनपिंग यांनी म्हटलं आहे. (Trump Tariffs)
हेही वाचा- दापोली मतदारसंघासाठी Yogesh Kadam यांच्याकडून १५० कोटींची भरीव तरतूद; विकासकामांना गती
चीनकडे सुमारे ६०० अब्ज पौंड (सुमारे $७६० अब्ज) अमेरिकन सरकारी रोखे आहेत. याचा अर्थ असा की चीनकडे अमेरिकन अर्थव्यवस्थेवर प्रभाव पाडण्याची मोठी शक्ती आहे. त्याच वेळी, चीननेही तयारी सुरू केली आहे. चीनने औद्योगिक क्षेत्राला १.९ ट्रिलियन डॉलर्सचे अतिरिक्त कर्ज दिले आहे. यामुळे येथील कारखान्यांचे बांधकाम आणि अपग्रेडेशन वेगाने झाले. हुआवेईने शांघायमध्ये ३५,००० अभियंत्यांसाठी एक संशोधन केंद्र उघडले आहे, जे गुगलच्या कॅलिफोर्नियातील मुख्यालयापेक्षा १० पट मोठे आहे. यामुळे तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षमता वाढेल. (Trump Tariffs)
हेही वाचा- Feeding to Animals and Birds : आयते अन्न-पाणी देऊन प्राण्यांची जीवनशैली बिघडवू नका !
बुधवारी चीनने ली चेंगगँग यांची नवीन आंतरराष्ट्रीय वाटाघाटी मध्यस्थपदी नेमणूक केली. ली हे वँग शौवेन यांची जागा घेतील. वँग यांनी २०२० च्या चीन-अमेरिकी व्यापार कराराच्या वाटाघाटीत भाग घेतला होता. (Trump Tariffs)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community