Mahua Moitra : खासदारांची हेरगिरी करण्याचा प्रयत्न, महुआ मोईत्रा यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

मंगळवारी राजधानी दिल्लीमध्ये खळबळ उडाली.

20
Mahua Moitra : खासदारांची हेरगिरी करण्याचा प्रयत्न, महुआ मोईत्रा यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र
Mahua Moitra : खासदारांची हेरगिरी करण्याचा प्रयत्न, महुआ मोईत्रा यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आपल्यावर पाळत ठेवली असून हेरगिरी केल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.

इंडिया आघाडीतील कॉंग्रेससह अनेक विरोधी पक्षांच्या (Opposition members) नेत्यांना त्यांचे आयफोन हॅक होण्याची आणि त्यातील माहिती सरकारी पाठबळ असलेल्या हॅकर्सकडून चोरली जाण्याची शक्यता असल्याचा मेसेज ई-मेलद्वारे अॅपलकडून पाठवण्यात आला होता. यामुळे मंगळवारी राजधानी दिल्लीमध्ये खळबळ उडाली.

अॅपलकडून आलेल्या मेसेजमुळे या संशयात वाढ झाली आहे. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांकडे मोईत्रा यांनी स्वातंत्र्य आणि कायद्याच्या राज्याची मर्यादा ओलांडणारी ही घटना असल्याचेही म्हटले आहे. महुआ मोईत्रा यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेले पत्र Xवर पोस्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.