Transfer of IAS Officer : राज्यातील १० मोठ्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; १९ वेळा बदली झालेले तुकाराम मुंढे कुठे जाणार?

मिलिंद म्हैसकर यांची सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

148
राज्य सरकारने मंगळवार, २ मे रोजी तब्बल १० महत्वाच्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या Transfer of IAS Officer केल्या. ज्यामध्ये मिलिंद म्हैसकर यांच्यासह डॉ. नितीन करीर आणि तुकाराम मुंढे यांचा समावेश आहे.

कोणत्या अधिकाऱ्यांना कोणती नवी जबाबदारी?

  • 1998 च्या बॅचचे आयएएस अधिकारी डॉ.  नितीन करीर हे सध्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून महसूल, नोंदणी आणि मुद्रांक, महसूल आणि वन विभागाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांना अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
  • 1992 च्या बॅचचे अधिकारी मिलिंद म्हैसकर यांची सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • 1994 च्या बॅचचे अधिकारी डी.टी. वाघमारे यांची गृहविभागाच्या PS (A&S) म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
  • 1995 च्या अधिकारी राधिका रस्तोगी यांची अल्पसंख्याक विकास विभागाच्या प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

(हेही वाचा Sharad Pawar : पक्षाच्या अध्यक्षपदावरील निर्णयावर शरद पवार २-३ दिवसांत अंतिम निर्णय घेणार)

  • मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांची महापारेषण विभाागाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी  श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
  • तुकाराम मुंढे, कृषी आणि पशूसंवर्धन खात्याते अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • 2009 च्या बॅचचे आयएएस अधिकारी जी. श्रीकांत हे आता छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त असणार आहेत. त्यांच्याकडे सध्या राज्य कर विभागाचे छत्रपती संभाजीनगरचे सह-आयुक्त म्हणून जबाबदारी आहे.
  • छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त असलेले डॉ. अभिजित चौधरी यांची राज्य कर विभागात छत्रपती संभाजीनगरचे सह-आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • पी. शिव शंकर यांची श्री साईबाबा संस्थान ट्र्स्ट, शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या त्यांच्याकडे नागपूर टेक्सटाईल विभागाचे संचालक म्हणून जबाबदारी आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.