Parivartan Yatra : राजस्थानमध्ये परिवर्तन यात्रेचा शुभारंभ

भाजपाने २ ते ५ सप्टेंबर या कालावधीत एकूण चार परिवर्तन यात्रांचे आयोजन केले आहे.

26
Parivartan Yatra : राजस्थानमध्ये परिवर्तन यात्रेचा शुभारंभ
Parivartan Yatra : राजस्थानमध्ये परिवर्तन यात्रेचा शुभारंभ

काँग्रेस सरकारच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी तसेच जनतेला जागृत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने शनिवार (०२ सप्टेंबर) पासून राजस्थानमध्ये परिवर्तन यात्रेचा शुभारंभ केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथे भाजपाने २ ते ५ सप्टेंबर या कालावधीत एकूण चार परिवर्तन यात्रांचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे या यात्रांचे नेतृत्व केंद्रीय नेतेच करणार आहेत.

राजस्थानमध्ये या वर्षाअखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. राजस्थानातील काँग्रेसची सत्ता घालवण्यासाठी भाजपची जोरदार तयारी सुरू आहे. यासाठीच आता परिवर्तन यात्रा काढण्यात येणार आहे. त्यासाठी भाजपने सर्व तयारी पूर्ण केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष राज्यातील सर्व २०० विधानसभा मतदारसंघात पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे.

राज्यातील सर्व भाजप नेत्यांना एका व्यासपीठावर एकत्र आणून एकतेचा संदेश देणे हा या यात्रेमागचा एक प्रमुख उद्देश आहे. हा प्रवास संपूर्ण राज्यात सुमारे २३ दिवस चालणार आहे. यात्रेच्या माध्यमातून सर्व घटकांशी जिल्हानिहाय संवाद होणार आहे. विविध जिल्ह्यांमध्ये समितीचे कार्यक्रम आयोजित केले जातील. सर्व विभागांशी चर्चा करून भाजप जाहीरनामा तयार करणार असल्याचे मेघवाल यांनी सांगितले.

(हेही वाचा – IND vs PAK Asia Cup : भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाचा खोडा, काही वेळेसाठी सामना थांबला)

दरम्यान, भाजपाने आयोजित केलेली ही परिवर्तन यात्रा राजस्थानमधील सर्वच २०० मतदारसंघांतून जाणार आहे. साधारण २० दिवस ही यात्रा असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने या यात्रेचा समारोप होण्याची शक्यता आहे. राजस्थानमधील गटबाजीला आळा बसावा यासाठी या यात्रांचे नेतृत्व सध्या तरी केंद्रातील नेतेच करणार आहेत. भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, राजस्थान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी, वसुंधरा राजे देखील या यात्रांमध्ये सहभागी झाले आहे. तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदी नेते या यात्रांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.