रत्नागिरीत हिंदूंचा एल्गार; गोवंश हत्या करणाऱ्या धर्मांधाला अटक करण्याच्या मागणीसाठी हजारो Hindu रस्त्यावर

सकाळी ११ वाजता भर पावसात मारुती मंदिरपासून सुरू झालेला सकल हिंदु समाजाचा मोर्चा शिस्तीत जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयावर धडकला.

114

गोवंश हत्या प्रकरणात धर्मांध मुसलमान आरोपीला अटक करून न्यायालयापुढे हजर करण्याच्या मागणीसाठी रत्नागिरीत सकल हिंदू (Hindu)  समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. पोलिसांना दिलेल्या मुदतीत पोलिसांकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याचे समजताच सकाळी ११ वाजता निघालेल्या मोर्चाचे रूपांतर ठिय्या आंदोलनात झाले. ठिय्या आंदोलन करूनही पोलीस ठोस कारवाई करताना दिसले नसल्याने अखेर जेलरोड नाक्यात मुख्य रस्ता रोकण्यात आला. त्यामुळे सुमारे तीन तास वाहतूक विस्कळित झाली. हिंदूंनी (Hindu) केलेल्या संघर्षानंतर पोलिसांनी अखेर कारवाई करत आरोपींना अटक करून न्यायालयापुढे हजर केले. आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर समस्त हिंदूंनी आंदोलन मागे घेतले.

निलेश राणे मोर्चात सहभागी 

सर्व हिंदूंच्या (Hindu) नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात माजी खासदार निलेश राणे यांनी महत्वाची भूमिका बजावली. राणे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडले. समस्त हिंदूंच्या एकीचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिली. आंदोलन समाप्तीनंतर निलेश राणे म्हणाले, ही सुरुवात असून भविष्यात हिंदूंना एकत्रित राहून यापेक्षा गर्दी करून विविध प्रश्नांना वाचा फोडायला लागणार आहे. त्याचवेळी त्यांनी पोलिसांना कडक इशारा दिला. पोलिसांनी जर या आंदोलनानंतर कोणत्याही हिंदूंवर धाकदडपशाही केली तर निलेश राणे यांचा नंबर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहे, हे लक्षात ठेवा. कोणत्याही परिस्थितीत हिंदुंवर अन्याय अत्याचार होता कामा नयेत, अशी आक्रमक इशारावजा मागणी केली.

(हेही वाचा Rahul Gandhi : गांधी घराण्याच्या वंशजाची बालकबुद्धी!)

आधी मोर्चा, मग ठिय्या नंतर रस्ता बंद 

सकाळी ११ वाजता भर पावसात मारुती मंदिरपासून सुरू झालेला सकल हिंदु समाजाचा मोर्चा शिस्तीत जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयावर धडकला. पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर बरिकेट्स लावून रस्ता बंद करण्यात आला होता. पोलिसांकडून अधीक्षकांना पाच लोकांनी भेटावे असे सांगण्यात आले. मात्र  पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आंदोलकांना भेटायला यावे आणि कोणती कारवाई केली ते सांगावे अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर पोलीस अधीक्षक आले आणि त्यांनी थातुरमातुर कारणे सांगत कारवाई केल्याचे सांगितले. मात्र आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्याची मागणी करण्यात आली. ती मागणी पूर्ण होईपर्यंत कोणीही हटणार नाही, असा इशारा देण्यात आला. त्यामुळे आंदोलकांनी प्रथम ठिय्या आंदोलन केले. मात्र तरीही कोणतीही ठोस कारवाई होत नाही म्हटल्यावर सगळ्या आंदोलकांनी जेलरोड येथे मुख्य रस्ता अडवला. त्यामुळे सुमारे तीन तास वाहतूक विस्कळित झाली. हिंदूंनी केलेल्या संघर्षानंतर पोलिसांनी अखेर कारवाई करत आरोपींना अटक करून न्यायालयापुढे हजर केले. आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर समस्त हिंदूंनी आंदोलन मागे घेतले. या मोर्च्यात हजारो हिंदू बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. गोमाता अपनी माता भारत माता सबकी माता, गोहत्या को बंद करेंगे ये संकल्प हमारा है अशा घोषणांचे फलक घेवून आणि हातामध्ये भगवा ध्वज घेवून सकल हिंदु समाज मोर्चाला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. सर्व स्तरातील हिंदु बांधव मोर्चात सहभागी झाले आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.