
Ravindra Chavan : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर, शिवसेना उबाठाने (ShivSena UBT) बुधवारी नाशिकमधील सभेत शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray AI video) यांच्या आवाजातील १३ मिनिटांचे भाषण प्रसारित करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच AI चा वापर केला होता. आता याच व्हिडिओ संबंधी भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंवर खसडून टीका केली आहे. दरम्यान या संबंधी सर्वत्रच टीका होत आहे. (Ravindra Chavan)
सत्तेच्या स्वार्थासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आता महाराष्ट्र अजिबात विचारत नाही !
त्यामुळेच आपलेच विचार AI च्या मदतीने आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात उतरवण्याचा करंटेपणा आज उद्धव ठाकरे यांनी…
— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) April 16, 2025
रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) म्हणाले की, “सत्तेच्या स्वार्थासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आता महाराष्ट्र अजिबात विचारत नाही. त्यामुळेच आपलेच विचार AI च्या मदतीने आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात उतरवण्याचा करंटेपणा आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला. ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ म्हणतात ते हेच’. जर आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हयात असते, तर ‘जनाब’ उद्धव ठाकरेंची वैचारिक दिवाळखोरी बघून साहेब काय गरजले असते याचा विचार करा,” असे रवींद्र चव्हाण म्हणाले.
(हेही वाचा – Murshidabad Violence नंतर मानवाधिकारवाल्यांच्या वॉलवर शुकशुकाट)
‘बाळासाहेबांचे विचार बुडाले’
महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उपहासात्मक टीका करत म्हटले की, तुमचा आवाज कोणी ऐकत नाही, म्हणूनच बाळासाहेबांच्या आवाजात आपले विचार मांडण्याचे हे बालिश कृत्य फक्त उद्धव गटासारखे पक्षच करू शकतात.
(हेही वाचा – दाऊदी बोहरा मुसलमानांकडून Waqf Ammendment Law चे स्वागत; पंतप्रधान मोदींना भेटून मानले आभार)
पुढे म्हणाले की, “किमान बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज ज्या गोष्टींसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले त्याविरुद्ध वापरला जाऊ नये. त्यांचे विचार बुडवले गेले आहेत. किमान त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आवाजाचा असा गैरवापर करू नका.” असे विधान महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी केले .
हेही पहा –
Join Our WhatsApp Community