-
प्रतिनिधी
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीतर्फे मुंबईतील हुतात्मा स्मारक येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केंद्र सरकारवर कठोर शब्दांत निशाणा साधत, “ही केवळ श्रद्धांजली वाहण्याची वेळ नाही, दहशतवादाविरोधात ठोस पावले उचलण्याची ऐतिहासिक संधी आहे,” असा परखड इशारा दिला.
(हेही वाचा – Rajasthan High Court : खरंच गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळतो का?)
आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, “दहशतवादी हल्ले वारंवार होत आहेत. जनता मरण पावते, सैनिक हुतात्मा होतात आणि सरकार फक्त नोंद घेते. आता कृतीची वेळ आहे. केवळ ‘हवी तशी कारवाई करा’ असं लष्कराला सांगून जबाबदारी टाळता येणार नाही.” त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट उद्देशून म्हटले की, “१९७१ मध्ये इंदिरा गांधींनी जगासमोर निर्वासितांचा प्रश्न मांडून बांगलादेश निर्माण केला, तशीच ऐतिहासिक संधी आज मोदींसमोर आहे. जग पाकिस्तानकडे ‘आतंकवादी देश’ म्हणून पाहत आहे. आता निर्णयाची वेळ आहे.”
(हेही वाचा – Pahalgam Terror Update: पाकिस्तानने वाघा बॉर्डरचे दरवाजे उघडले; देशात अडकलेल्या पाक नागरिकांना मायदेशी परतण्याची दिली परवानगी)
राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीवरूनही आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) टीका केली. “६३ हजार कोटींचे विमाने २०३० मध्ये येणार आहेत, तोच पैसा आजच्या कारवाईसाठी वापरा. जनतेला विश्वासात घ्या, ती तुमच्या पाठीशी उभी राहील,” असे ते ठामपणे म्हणाले. कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीच्या अनेक नेत्यांची उपस्थिती होती. प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, अॅड. प्रियदर्शी तेलंग, डॉ. नितीन ढेपे, सुजात आंबेडकर, माजी आमदार कपिल पाटील आदींचा समावेश होता. या श्रद्धांजली कार्यक्रमाने केवळ श्रद्धा व्यक्त केली नाही, तर देशाच्या सुरक्षा धोरणावर गंभीर राजकीय प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारला जबाबदारीची जाणीव करून दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community