भारत – पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीचा निर्णय झाल्यानंतर लागलीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी मध्यस्थी करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रश्नात कोणत्याही तिसऱ्या देशाची आवश्यकता नाही, असे ठामपणे सांगितले. मंगळवार, १३ मे रोजी परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव रणधीर जयस्वाल यांनीही या काश्मीर (Jammu – Kashmir) विषयावर तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप अमान्य आहे, असेही ते म्हणाले.
भारत-पाकिस्तान हा प्रश्न आपापसात सोडवतील, पाकिस्तानला पीओके रिकामा करावे लागेल. सर्व प्रकरणे द्विपक्षीय पद्धतीने सोडवली जातील, असे जयस्वाल म्हणाले. खरं तर, भारताच्या या प्रतिक्रियेला जम्मू-काश्मीर (Jammu – Kashmir) वाद सोडवण्याच्या मुद्द्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाशी जोडले जात आहे. ट्रम्प यांनी ११ मे रोजी म्हटले होते की, ‘हजार वर्षांनंतर’ काश्मीर प्रश्नावर तोडगा निघू शकतो का हे पाहण्यासाठी मी दोघांसोबत एकत्र काम करण्याचा प्रयत्न करेन.’ १० मे रोजी ट्रम्प यांनी सोशल मीडियावर भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीची माहिती दिली होती.
जगभरातील नेत्यांनी हे मान्य केले की, भारताला स्वतःच्या सुरक्षेचा अधिकार आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने २५ एप्रिल रोजी म्हटले की दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. आमच्या नेतृत्वाने म्हटले आहे की, आम्ही सीमापार दहशतवाद सहन करणार नाही. याला योग्य उत्तर दिले जाईल. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हॅन्स यांच्याशी चर्चा केली. दोघांमधील संभाषणाची माहिती देण्यात आली आहे. बांगलादेशच्या अवामी लीगवरील बंदी ही चिंतेची बाब आहे. लोकशाहीमध्ये गोष्टी अशाच प्रकारे चालतात. त्याला बाजूला करण्यात आले आहे. बांगलादेशात स्वातंत्र्य रोखले जात आहे. राजकीय हालचालींची व्याप्ती मर्यादित केली जात आहे याची आम्हाला चिंता आहे. आम्हाला वाटते की बांगलादेशात निष्पक्ष निवडणुका व्हायला हव्या, असेही जयस्वाल म्हणाले. (Jammu – Kashmir)
BSF कॉन्स्टेबल बीके साहू २० दिवसांपासून पाकिस्तानच्या ताब्यात आहे. त्याला सोडण्याच्या प्रश्नावर रणधीर जैस्वाल म्हणाले, माझ्याकडे याबद्दल कोणतेही अपडेट नाही. लष्कर आणि संरक्षण मंत्रालय यावर काम करत आहेत. दोन्ही देशांमध्ये कशी चर्चा झाली. पण मी त्याची माहिती देऊ शकत नाही. आम्ही UNSC ची मॉनिटरिंग कमिटी द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) ला दहशतवादी संघटना म्हणून सूचीबद्ध करण्यास सांगितले आहे. त्याचे उत्तर तुम्हाला काही दिवसांत मिळेल, असेही जयस्वाल म्हणाले.
Join Our WhatsApp Community