भर सभागृहात शिवीगाळ करणं भोवलं, अखेर Ambadas Danve यांच्यावर मोठी कारवाई 

179
भर सभागृहात शिवीगाळ करणं भोवलं, अखेर Ambadas Danve यांच्यावर मोठी कारवाई 
भर सभागृहात शिवीगाळ करणं भोवलं, अखेर Ambadas Danve यांच्यावर मोठी कारवाई 

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हिंदूंवरून केलेल्या वक्तव्यावरील निषेध प्रस्तावावर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिवीगाळ केली होती. आमदार प्रसाद लाड (MLA Prasad Laad)  यांना दिलेली शिवी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना महागात पडली असून, त्यांना ५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे.  (Ambadas Danve)

नेमकं काय घडलं ?

विधीमंडळाचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. हे अधिवेशन सुरु असताना सोमवारी (1 जुलै) विधीमंडळात मोठा गदारोळ झाला. लोकसभेत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणावर निषेध ठराव मंजूर करण्याचा प्रस्ताव सत्ताधारी आमदारांनी विधान परिषदेत मांडला. तसेच राहुल गांधी यांच्या भाषणावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भूमिका मांडावी, अशी मागणी सत्ताधारी आमदारांनी केली.  (Ambadas Danve)

(हेही वाचा – New Criminal Law : नवीन कायद्याच्या अंमलबजावणीच्या पहिल्या दिवशी राज्यात ७६, तर मुंबईत १६ गुन्हे दाखल)

यामध्ये आमदार प्रसाद लाड आणि भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर (BJP Group leader Praveen Darekar) यांचा समावेश होता. यावेळी अंबादास दानवे यांनी लोकसभेत झालेल्या घडामोडींवर विधान परिषदेत चर्चा करण्याची गरज नाही, अशी भूमिका मांडली. यावेळी सत्ताधारी आमदारांनी अंबादास दानवे यांना विरोध केला. यामुळे वैतागलेल्या दानवेंनी भर सभागृहात आपल्या जागेवरुन बाजूला होत आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. यावेळी प्रसाद लाड यांनी देखील त्यांना प्रत्युत्तर देत शिवीगाळ केली.     (Ambadas Danve)

(हेही वाचा – Navi Mumbai : मुंबई, ठाण्यानंतर अनधिकृत पब आणि बारवरील कारवाईचा बडगा नवी मुंबईत)

दानवेंना पश्चाताप नाही…

मी शिवसैनिक आहे. शिवसैनिकाच्या बाण्यानं उत्तर दिलं. समोरच्याचे काहीही सहन करणार नाही. मी बोललो ते बोललो, पळपुटा थोडी आहे. असे विधान उबाठा गटाचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केले. हिंदुत्व वैगेरे प्रसाद लाड यांच्यासारखे लोक शिकवतात, जे धंद्यापाण्यासाठी जिथे सत्ता आहे तिथे घुसतात. तसं आम्ही नाही करत, हे लोक आम्हाला हिंदुत्व काय शिकवणार, हिंदुत्वासाठी काय काय करावं लागते आणि याआधी काय केले हे त्यांना माहिती नाही. मी सभापतींशी बोलत होतो. सभागृहात सभापतींसमोर बोलले पाहिजे. माझ्याकडे हातवारे, अंगविक्षेप करण्याची गरज नव्हती. विरोधी पक्षनेता हा आक्रमकच असला पाहिजे असंही अंबादास दानवेंनी म्हटले होते.  (Ambadas Danve)

हेही वाचा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.