Sharad Pawar : शरद पवार कुणाचे? लेकीचे की पुतण्याचे?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार रालोआत सामील होण्याबाबत कुजबूज ऐकायला मिळत आहे

173
Sharad Pawar : शरद पवार कुणाचे? लेकीचे की पुतण्याचे?
Sharad Pawar : शरद पवार कुणाचे? लेकीचे की पुतण्याचे?
  • वंदना बर्वे 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होण्यास अनुकूल असल्याचे संकेत आहेत. परंतु, कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे रालोआत सामील होण्यास कडाडून विरोध करीत असल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय मार्गावरील भाजपच्या मुख्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार रालोआत सामील होण्याबाबत कुजबूज ऐकायला मिळत आहे. तसं बघितलं तर, भारताच्या राजकारणात शरद पवार यांचे पुढचे काय असेल? याचा अंदाज कुणीच बांधू शकत नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडी सोडून ते रालोआचा भाग होऊ शकतात, अशी कुजबूज सुरू आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलिकडेच शरद पवार यांची एका मोठ्या उद्योगपतींच्या घरी भेट घेतली होती. ही कौटुंबिक भेट होती, असे दोन्ही नेत्यांच्या गोटातून सांगितले जात आहे. परंतु, ही भेट खरंच कौटुंबिक असती तर काका आणि पुतणे आपल्या घरी भेटले नसते काय? असा उलटप्रश्न भाजप नेत्यांकडून उपस्थित केला जात आहे. सध्या, अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासह खासदार आणि आमदार रालोआ आघाडीत सामील झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचे सदस्य झाले आहेत. दरम्यान, ‘मुख्यमंत्री व्हायचं असेल तर शरद पवार यांना रालोआत आणा’, अशी अट भाजपने अजित पवार यांच्यापुढे घातली असल्याचे सांगून महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खळबळ उडवून दिली होती. अशातच, काका-पुतण्याच्या झालेल्या भेटीने तेलाच्या उकळत्या कढईत पाणी शिंपडण्याचे काम केले आहे.

(हेही वाचा – Green Tea : दिवसाची सुरुवात ग्रीन टी पिऊन करणे योग्य आहे का ? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात)

शरद पवार रालोआत सामील होण्यास अनुकूल आहेत. परंतु, कन्या सुप्रिया सुळे भाजपसोबत जाण्यास टोकाचा विरोध करीत आहेत, अशी चर्चा मुख्यालयात ऐकायला मिळत आहे. थोडक्यात, बाप-लेकीमध्ये तू-तू-मै-मै सुरू आहे. एकीकडे, अजित पवार काकांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतात तर दुसरीकडे मुलगी सुप्रिया सुळे त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न करतात. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत शरद पवार हेही रालोआत सामील झाले तर विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या झोळीत मराठा मतांचा पाऊस पडल्याशिवाय राहणार नाही, असे भाजपला वाटत आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे सुध्दा शरद पवार यांना रालोआत आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. भाजपसोबत गेल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे काही भवितव्य नाही, असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले होते. सुप्रिया सुळे यांनी यावर तीव्र आक्षेप घेत भाजपसोबत जाण्यास आपला विरोध दर्शविला होता. याचवेळी भुजबळ यांनी शांत बसण्याचा सल्ला सुळे यांना दिला होता. ही बाब शरद पवार यांना खटकली असल्याचीही चर्चा आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.