Prashant Kishor : प्रशांत किशोर टीडीपीच्या मार्गावर

किशोर यांनी यापूर्वी आंध्र प्रदेशात त्यांनी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यासोबत काम केले होते. आता ते त्यांचे रेड्डी यांचे प्रतिस्पर्धी चंद्राबाबू यांच्यासाठी रणनीतीच्या दृष्टीकोनातून काम करण्याचे संकेत दिले आहेत.

177
Prashant Kishor : प्रशांत किशोर टीडीपीच्या मार्गावर
Prashant Kishor : प्रशांत किशोर टीडीपीच्या मार्गावर

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) अचानक आंध्र प्रदेशमध्ये परतले आहेत. मात्र, यावेळी ते टीडीपीसोबतच (TDP) राहणार असल्याचे आंध्र प्रदेशात आता सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवरून स्पष्ट झाले आहे. किशोर यांनी यापूर्वी आंध्र प्रदेशात त्यांनी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (CM Jagan Mohan Reddy) यांच्यासोबत काम केले होते. आता ते त्यांचे रेड्डी यांचे प्रतिस्पर्धी चंद्राबाबू यांच्यासाठी रणनीतीच्या दृष्टीकोनातून काम करण्याचे संकेत दिले आहेत. टीडीपीचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या निवासस्थानी त्यांची दीर्घ चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. (Prashant Kishor)

माहितीनुसार, प्रशांत किशोर (Prashant Kishor) आणि नायडू यांच्यात सुमारे ३ तास चर्चा झाली. या दोघांमध्ये आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशांत हे टीडीपीचे (TDP) मुख्य निवडणूक रणनीतिकार म्हणून काम करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याशिवाय शो टाईम कन्सल्टन्सीचे संचालक संथनु सिंग आणि रॉबिन शर्मा देखील उपस्थित राहणार आहेत. हे दोघेही आधीच टीडीपीसाठी (TDP) काम करत आहेत. अशा स्थितीत प्रशांत जे काही रणनीती आखतील त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. प्रशांत (Prashant Kishor) यांच्यासोबत टीडीपी हायकमांडची (TDP High Command) आणखी एक बैठक होणार असून, त्यानंतर हा करार निश्चित होईल. (Prashant Kishor)

(हेही वाचा – MIDC : मालकी हक्क नसलेल्या ३४ हेक्टर भूखंडासाठी ‘एमआयडीसी’ने दिले ५ कोटी; ‘कॅग’च्या अहवालात धक्कादायक उघड)

प्राप्त माहितीनुसार, प्रशांत (Prashant Kishor) आणि नायडू यांना एकत्र काम करण्यास अंतिम मंजुरी मिळाल्यास ते टीडीपीमध्ये जातील. प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वायएसआरसीपीसाठी काम केले आहे. २०१९ मध्ये टीडीपीचा पराभव करून राज्यात वायएसआरसीपीला (YSRCP) सत्तेवर आणण्यातही त्यांनी मोठी भूमिका बजावली. त्यांनी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (CM Jagan Mohan Reddy) यांच्या निवडणूक प्रचाराची तयारी केली. (Prashant Kishor)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.