Rajkot किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण !

Rajkot किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण !

83
Rajkot किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण !
Rajkot किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण !

मालवणच्या राजकोट (Rajkot) किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण आज (11 मे 2025) दुपारी 12 वाजता पार पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्य मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व नितेश राणे यावेळी उपस्थितीत असतील. (Rajkot)

शिल्पकार राम सुतार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प साकारले आहे. त्यांचे सुपुत्र अनिल सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण पुतळा साकारण्यात आला आहे. ह्या पुतळ्याची उंची तलवारीच्या टोकापर्यंत 83 फुट आहे. सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील राजकोट किल्ल्याजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा योद्धा भूमिकेत असलेल्या तलवारधारी 60 फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे. (Rajkot)

तलवारीसह पुतळ्याची एकूण उंची 83 फूट इतकी आहे. तसेच पुतळ्याच्या चबुतराची उंची १० फूट इतकी आहे. जमीन पातळीपासून या पुतळ्याची एकूण उंची 93 फुट इतकी आहे. पुतळा उभारण्यासाठी ब्राँझ धातूचा उपयोग करण्यात आला असुन यामध्ये 88% तांबे, 4% जस्त व 8% कथिल धातूचा समावेश आहे. पुतळ्यासाठी सरासरी 6 ते 8 मिलिमीटर जाडीचे कांस्य वापरण्यात आले आहे. (Rajkot)

या कामासाठी DUPLEX स्टेनलेस स्टीलचे सपोर्ट फ्रेमवर्क, स्टेनलेस स्टील SS 316 दर्जाचे सळई असे गंजरोधक बांधकाम साहित्य वापरण्यात आले आहे. चबुतरासाठी उच्च दर्जाचे काँक्रीट तसेच स्टेनलेस सळई वापरण्यात आले आहे. सदर पुतळा सर्व वातावरणीय परिणामांच्या माऱ्यास योग्य प्रकारे तोंड येईल, या पद्धतीने संरचनात्मक संकल्पना करून बांधण्यात आला आहे. (Rajkot)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.