Vanchit Bahujan Aghadi च्या भुमिकेमुळे महाविकास आघाडीत संभ्रम?

एकीकडे महाविकास आघाडीत समाविष्ट होण्यासाठी चाललेली धडपड आणि दुसरीकडे जागावाटप अंतिम झाले नसताना मुंबईत लोकसभा मतदार संघात निवडणूक लढवण्याची सुरू केलेली तयारी यावरुन वंचित बहुजन आघाडी दबावतंत्राचा वापर करत आहे की पक्षाचा ‘प्लान बी’ तयार करत आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

170
Vanchit Bahujan Aghadi च्या भुमिकेमुळे महाविकास आघाडीत संभ्रम?
Vanchit Bahujan Aghadi च्या भुमिकेमुळे महाविकास आघाडीत संभ्रम?

एकीकडे महाविकास आघाडीत समाविष्ट होण्यासाठी चाललेली धडपड आणि दुसरीकडे जागावाटप अंतिम झाले नसताना मुंबईत लोकसभा मतदार संघात निवडणूक लढवण्याची सुरू केलेली तयारी यावरुन वंचित बहुजन आघाडी दबावतंत्राचा वापर करत आहे की पक्षाचा ‘प्लान बी’ तयार करत आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. तसेच गेल्या दोन दिवसांपासून वंचित आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या विधानांनी महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून येते. (Vanchit Bahujan Aghadi)

‘वंचित’ची मुंबईत लोकसभेची तयारी

वंचित बहुजन आघाडी प्रमुख आंबेडकर यांचे पुत्र सुजात यांनी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात ‘रविवारी जन संवाद यात्रा’ काढली. मुंबईत दक्षिण-मध्य आणि उत्तर मध्य या दोन मतदार संघामध्ये वंचितने काम सुरु केल्याचे समजते. वास्तविक मुंबईत सहापैकी चार जागा शिवसेना उबाठा (UBT) तर दोन काँग्रेस लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, तरी वंचितने यातील दोन जागांवर तयारी सुरू केल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. (Vanchit Bahujan Aghadi)

शिंदे हिरो ठरले

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्तुती करत मराठा आंदोलन चांगल्या पद्धतीने हाताळल्याचे सांगितले. शिंदे मराठा समाजात सगळ्या नेत्यांना मागे टाकत हिरो ठरले, असे विधान करुन राजकीय मित्र उबाठाविरुद्ध भुमिका घेतली. वंचित जरी महाविकास आघाडीचा भाग नसला तरी ठाकरे गटाशी युतीत आहे. (Vanchit Bahujan Aghadi)

(हेही वाचा – NCP MLA disqualification case : राहुल नार्वेकरांना १५ फेब्रुवारीपर्यंत वाढीव मुदत)

इंडी आघाडीचे अस्तित्व संपले

राजद (यु) नेते नितीश कुमार यांनी इंडी आघाडी सोडल्यावर प्रतिक्रिया देताना आंबेडकर यांनी इंडी आघाडीचे अस्तित्व संपल्याचेही विधान करुन खळबळ उडवून दिली. नितीश कुमार, ममता बॅनर्जी आणि आप यांनी इंडी पासून फारकत घेतल्याने इंडी आघाडीचे अस्तित्व संपल्यासारखे आहे, असे ते म्हणाले. (Vanchit Bahujan Aghadi)

आंबेडकरांच्या विधानांनी उलटसुलट चर्चा

गेले काही महिने वंचितने महाविकास आघाडीत समावेश होण्यासाठी नानाविध प्रयत्न केले. आता राष्ट्रवादीचे जयंत पवार यांच्या मध्यस्थीने वंचितला उद्या ३० जानेवारीला होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीला काँग्रेसकडून निमंत्रण देण्यात आले आणि त्यांनीही बैठकीला येण्याचे मान्य केले. अशा परिस्थितीत आंबेडकरांच्या विधानांनी महाविकास आघाडीतच उलटसुलट चर्चा होत आहे. (Vanchit Bahujan Aghadi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.